Kitchen Hacks: गॅस असो वा लोखंडी भांडी 'अशी' करा स्वच्छ, फॉलो करा सोपे हॅक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Hacks: गॅस असो वा लोखंडी भांडी 'अशी' करा स्वच्छ, फॉलो करा सोपे हॅक्स

Kitchen Hacks: गॅस असो वा लोखंडी भांडी 'अशी' करा स्वच्छ, फॉलो करा सोपे हॅक्स

Published Oct 10, 2022 10:54 AM IST

शेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर गॅस आणि लोखंडी भांडी साफ करण्यासाठी काही सोपे हॅक शेअर केले आहेत.

<p>किचन हॅक्स</p>
<p>किचन हॅक्स</p> (Freepik)

घराघरांत दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरातील कॅबिनेट असो की जुनी भांडी, प्रत्येकजण सगळ्या वस्तू साफ करत असतो. स्वयंपाकघरातील गॅस फार महत्त्वचा असतो.अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यावर अन्न पडते आणि नंतर गॅस खूप घाण होतो. जे साफ करणे खूप कठीण आहे. त्याचबरोबर ज्या भांड्यात अन्न शिजवलं जात ती भांडी स्वच्छ करणेही कठीण जाते. अशा परिस्थितीत, दोन्ही गोष्टींची चमक परत आणण्यासाठी तुम्ही काही हॅकचा अवलंब करू शकता.

शेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर गॅस आणि लोखंडी भांडी साफ करण्यासाठी काही सोपे  हॅक शेअर केले आहेत. जे तुम्ही देखील फॉलो करू शकता.

गॅस साफ करण्यासाठी हॅक

गॅस स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला बेकिंग सोडा आणि व्हिनेगर आवश्यक आहे. यासाठी बेकिंग सोडामध्ये व्हिनेगर मिक्स करून पेस्ट तयार करा. त्याची पेस्ट झाल्यावर गॅसवर पसरवा. काही वेळ थांबा आणि नंतर स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा. तुम्हाला ते हलक्या हातांनी घासावे लागेल. चांगले घासल्यानंतर ओल्या कापडाने स्वच्छ करा. तुम्हाला दिसेल की स्टोव्ह पूर्वीपेक्षा उजळ आहे.

लोखंडी भांडी कशी स्वच्छ करावी?

लोखंडी कढईंना अनेकदा गंज लागतो. अशा परिस्थितीत, आपण ते साफ करण्यासाठी क्लिनिंग हॅकचा अवलंब करू शकता. यासाठी प्रथम तवा किंवा कढई व्यवस्थित स्वच्छ करा आणि नंतर कापडाने पुसून कोरडी करा. आता त्यात तेल टाका आणि कापडाच्या साहाय्याने साफ करा. सर्व बाजूंनी चांगले तेल लावा. असे केल्याने तुम्ही भांडी गंजण्यापासून वाचवू शकता.

Whats_app_banner