Thyroid treatment: थायरॉईड हा आजच्या काळात एक सामान्य आजार बनला आहे.कारण तुम्हाला १० पैकी ५ जण या आजाराने ग्रस्त असलेले दिसून येतील. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स आढळतात आणि हे हार्मोन्स शरीरातील काही ग्रंथींमधून बाहेर पडतात. थायरॉईड ग्रंथीमधून बाहेर पडणारे थायरॉईड संप्रेरकांचादेखील यामध्ये समावेश आहे.थायरॉईड ग्रंथीचा आकार फुलपाखरासारखा असतो. हे मेंदू, हृदय आणि शरीराच्या इतर अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. थायरॉईडशी संबंधित समस्यांची मुख्य कारणे म्हणजे खानपानाची अयोग्य पद्धत आणि तणावपूर्ण जीवनशैली होय. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते.
थायरॉईडला मुळापासून काढून टाकण्यासाठी आयुर्वेदिक औषध हा सर्वोत्तम मार्ग आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला थायरॉईडची पातळी नियंत्रित करायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही प्रभावी गोष्टींचा समावेश करू शकता. पाहूया या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत...
थायरॉईड दूर करण्यासाठी धण्याचे पाणी थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. याचा वापर करण्यासाठी दोन चमचे धणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. यामुळे पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे थायरॉईडपासून आराम मिळतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिरवी कोथिंबीर थायरॉईडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. कोथिंबिरीच्या पानांमध्ये अ, क आणि ब जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. जे थायरॉईडची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर असतात. जे शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. थायरॉईडशी संबंधित आजारामध्ये हाडांमध्ये असह्य वेदना होतात. यापासून आराम मिळण्यासाठी कोथिंबीरीच्या पानांचा रस खूप फायदेशीर ठरतो.
तुळस आणि कोरफड ही दोन्ही शक्तिशाली पाने आहेत. थायरॉईड संप्रेरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे थायरॉइडच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
तुळशीची पाने आयुर्वेदातील सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी एक मानली जातात. ही पाने अनेक रोग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. थायरॉईडशी संबंधित आजार दूर करण्यासाठी त्याचा रस सेवन केला जाऊ शकतो. दोन चमचे तुळशीच्या रसात एक चमचा कोरफडीचा रस मिसळून हे खास पेय तयार करा. याचे नियमित सेवन केल्यास थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळतो.
थायरॉईडच्या रुग्णांनी आपल्या आहारात अधिकाधिक भाज्या आणि फळांचा समावेश करावा. तसेच आयोडीनयुक्त आहाराचे पालन करा. प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे युक्त आहाराचा अवलंब करा. संपूर्ण धान्य आणि कमी फॅट्स असलेले अन्न देखील यासाठी फायदेशीर आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध आणि कॅल्शियम समृद्ध पदार्थांचा समावेश करण्याने चांगला फायदा होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)