Thyroid Home Remedies: थायरॉईडचा त्रास आता विसरा! घरीच बनवा 'हर्बल ड्रिंक', मिळेल फायदा-thyroid home remedies people with thyroid problems can make this herbal drink at home to get relief ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Home Remedies: थायरॉईडचा त्रास आता विसरा! घरीच बनवा 'हर्बल ड्रिंक', मिळेल फायदा

Thyroid Home Remedies: थायरॉईडचा त्रास आता विसरा! घरीच बनवा 'हर्बल ड्रिंक', मिळेल फायदा

Aug 04, 2024 02:17 PM IST

Thyroid Home Remedies: आजकाल थायरॉईडची समस्या अगदी सामान्य झाली आहे. थायरॉईडच्या अनियमिततेमुळे शरीरात वजन वाढणे, थकवा येणे, मूड बदलणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Thyroid Home Remedies
Thyroid Home Remedies (Freepik )

Thyroid Home Remedies:  सध्याच्या काळात बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच आजकाल थायरॉईडची समस्या अगदी सामान्य झाली आहे. थायरॉईडच्या अनियमिततेमुळे शरीरात वजन वाढणे, थकवा येणे, मूड बदलणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत सुप्रसिद्ध आहारतज्ञ रमिता कौर यांनी सोशल मीडियावर एका हर्बल ड्रिंकची माहिती शेअर केली आहे. सोबतच असं सांगितलं आहे की, हे पेय थायरॉइड नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. महत्वाचं म्हणजे या हर्बल ड्रिंकमध्ये अशा गोष्टींचा वापर करण्यात आला आहे, जे आपल्या प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहजासहजी उपलब्ध असतात.

 

साहित्य-

-दालचिनीची- १ इंच

-किसलेले आले: १/२ टीस्पून

-जिरे: १/२ टीस्पून

-जायफळ: एक चिमूटभर

-मुलेठी: १ इंच

-लिंबाचा रस-१/२ चमचा (पर्यायी)

-पाणी: १५० मि.ली

-हळद: एक चिमूटभर

 

हर्बल ड्रिंक रेसिपी-

-एका भांड्यात एक ग्लास पाणी घाला आणि त्यात या सर्व गोष्टी टाका.

- आता ते भांडं गॅसवर ठेवा आणि मंद आचेवर सुमारे १० मिनिटे उकळा.

- ते गाळून चहासारखे आस्वादाने प्या.

 

आपण हे हर्बल ड्रिंक आणखी एका पद्धतीनेदेखील बनवू शकतो. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात सर्व साहित्य टाका आणि भिजत ठेवा. त्यांनंतर सकाळी उठल्यावर ते पाणी उकळून प्या. त्यामुळे हे सर्व पदार्थ त्या पाण्यात चांगल्याप्रकारे भिजतील जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यात उतरेल.

महत्वाचं म्हणजे हे हर्बल ड्रिंक फक्त रिकाम्या पोटी प्यावे. ट्वेहच त्याचा योग्य तो लाभ तुम्हाला मिळेल. जर तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारात याचा समावेश केला तर हार्मोनल असंतुलनाची समस्या दूर होई.ल आणि तुमची त्रासदायक थायरॉईडची समस्यादेखील नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित होण्यास मदत होईल. पण लक्षात ठेवा थायरॉईडची समस्या अगदीच गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही स्वतःच उपाय करत राहिला तर तुम्हाला तुमच्या आजाराचे गांभीर्य लक्षात न आल्याने आणखी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग