मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Awareness Month: थायरॉईडची समस्या आहे? आहारात करा या ४ पोषक घटकांचा समावेश

Thyroid Awareness Month: थायरॉईडची समस्या आहे? आहारात करा या ४ पोषक घटकांचा समावेश

Jan 05, 2024 12:11 PM IST

How to Manage Thyroid: जर तुम्हालाही थायरॉईडची समस्या असेल तर तुमच्या रोजच्या आहारात या चार आवश्यक पोषक घटकांचा समावेश करायला विसरू नका. जाणून घ्या

थायरॉईडसाठी आवश्यक पोषक घटक
थायरॉईडसाठी आवश्यक पोषक घटक (unsplash)

Nutrients to Fight Thyroid: थायरॉईड हा हार्मोनल आजाराचा एक प्रकार आहे. थायरॉईडची समस्या बहुतेक लोकांना त्रास देते, विशेषतः महिलांना याचा फटका बसतो. थायरॉईडमध्ये औषधांसोबतच शरीराला योग्य पोषक घटक मिळणेही आवश्यक असते. थायरॉईड ग्रंथी ओव्हरअॅक्टिव्ह आणि अंडरअॅक्टिव्ह असते. त्यामुळे हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईडची समस्या उद्भवते. या समस्येचा सामना करण्यासाठी थायरॉईडच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य आहाराच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते, असे तज्ज्ञ सांगतात. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुमच्या आहारात या ४ पोषण घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. हे हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या थायरॉईडच्या समस्या कमी करतात. हे पोषक घटक कोणते आहेत ते जाणून घ्या.

सेलेनियम

तज्ज्ञांच्या मते थायरॉईड रोगासाठी सेलेनियम हे अत्यंत प्रभावी पोषक तत्व आहे. जर शरीराला पुरेशा प्रमाणात सेलेनियम मिळत असेल तर ते टी४ आणि टी३ हार्मोन्स तयार होण्यास मदत करते. हे ऑटोइम्यून थायरॉईड रोगात देखील आराम देते. याशिवाय ते थायरॉईड ग्रंथींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. हे मूड आणि चिडचिड देखील सुधारते. ब्राझील नट्समध्ये सर्वाधिक प्रमाणात सेलेनियम असते. फक्त ३ नट्स खाल्ल्याने तुमची सेलेनियमची रोजची गरज पूर्ण होते.

ट्रेंडिंग न्यूज

झिंक

थायरॉईडची समस्या असल्यास शरीरासाठी झिंक आवश्यक आहे. हे वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि थायरॉईड हार्मोन्सला रेग्युलेट करते. केस गळण्याची समस्या देखील कमी होते. भोपळ्याच्या बिया हे झिंकचा उत्कृष्ट स्रोत आहेत. हे आहारात घेतल्यास झिंकची कमतरता दूर होते.

इलेक्ट्रोलाइट्स

थायरॉईडच्या समस्या असल्यास इलेक्ट्रोलाइट्सकडे दुर्लक्ष करु नये. हे शरीराला हायड्रेट करते. ज्यामुळे थायरॉईडचे कार्य योग्य प्रकारे होते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य चयापचय राखून ठेवते. इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे थायरॉईडसोबतच केसांच्या आरोग्यावर आणि वजनावरही परिणाम होतो. त्यामुळे आहारात नारळ पाणी किंवा कच्चे नारळ अवश्य घ्यावे.

 

हळद

थायरॉईडच्या समस्यांमध्ये हळद खाणे फायदेशीर असते. त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. हे लिव्हर डिटॉक्स करते. तसेच हे चयापचय देखील मजबूत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel