Thyroid Awareness Month: थायरॉईडचे सीक्रेट लक्षणं आहेत या समस्या, वेळीच करा उपचार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Awareness Month: थायरॉईडचे सीक्रेट लक्षणं आहेत या समस्या, वेळीच करा उपचार

Thyroid Awareness Month: थायरॉईडचे सीक्रेट लक्षणं आहेत या समस्या, वेळीच करा उपचार

Published Jan 16, 2024 07:27 PM IST

Thyroid Disease: थायरॉईड हे एक प्रकारची हार्मोनल समस्या आहे. ज्यामध्ये शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. या आजारात अनेक लक्षणे दिसतात. त्यापैकी काही ओळखणे कठीण असते. याची सीक्रेट लक्षणे कोणती आहेत ती जाणून घ्या.

थायरॉईडचे लक्षणे
थायरॉईडचे लक्षणे (unsplash)

Secret Symptoms of Thyroid: स्त्री असो वा पुरुष दोघांनाही थायरॉईडची समस्या त्रासदायक ठरते. हे एक प्रकारचे हार्मोनल असंतुलन आहे जे अन्न योग्यरित्या उर्जेमध्ये बदलत नाही. थायरॉईड टी३ म्हणजेच ट्रायओडोथायरोनिन आणि टी४ म्हणजेच थायरॉक्सिन हार्मोन्स तयार करते. या हार्मोनच्या मदतीने श्वास, पचन, शरीराचे तापमान, हाडे, स्नायू, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे ठोके संतुलित ठेवण्यास मदत होते. जेव्हा या हार्मोन्सचे संतुलन बिघडते तेव्हा त्याला थायरॉईडची समस्या म्हणतात. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते. थायरॉईडची काही लक्षणे सामान्य आहेत. पण या सामान्य लक्षणांव्यतिरिक्त आणखी या काही समस्या जर महिलांमध्ये दिसत असतील तर लगेच थायरॉईडची तपासणी करणे आवश्यक आहे. हे थायरॉईडचे लक्षणे असू शकतात.

निद्रानाशाची समस्या

काही लोकांना थायरॉईडमुळे झोप येत नाही. त्याच वेळी काही महिलांना गाढ झोप न मिळाल्याने किंवा झोप लागल्यानंतरही थकवा जाणवतो. सकाळी उठल्यावर खूप थकल्यासारखे वाटते. महिलांना अंथरुणातून उठणे आणि रोजचे दैनंदिन काम करता येत नाही असे वाटते.

लो लिबिडो

लो लिबिडो म्हणजे कमी कामवासना ही एक प्रकारची लैंगिक समस्या आहे. ज्यामध्ये महिलांना सेक्सची इच्छा खूप कमी जाणवते. जेव्हा हार्मोन्स संतुलित नसतात तेव्हा एखाद्याला अंथरुणावर खूप थकवा जाणवतो.

थकवा आणि अशक्तपणा

सतत बसून आणि आराम करुनही अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. त्यामुळे कोणतेही काम करणे कठीण होते.

ही आहेत थायरॉईडची सामान्य लक्षणे

- वजन वाढणे

- ब्रेन फॉग म्हणजे गोष्टी विसरणे

- आवाजात बदल

- अशक्तपणा जाणवणे

- केस कोरडे आणि जाड होणे

- त्वचा खूप कोरडी होणे

- बद्धकोष्ठता

- थकवा

- मासिक पाळीत अडथळा

- थंडी सहन न होणे

- रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे

- स्नायूंमध्ये वेदना

- ह्रदयाचे ठोके मंद होणे

- डिप्रेशन

 

हायपोथायरॉईडमध्ये दिसतात ही लक्षणे

- थायरॉईड ग्रंथी वाढणे

- अस्वस्थता

- थरथरी

- तणाव

- वजन कमी होणे

- डोळ्यांत जळजळ होणे

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner