Walnut Oil Neck Massage: थायरॉईड ग्रंथी नीट काम करत नसल्यामुळे हायपरथायरॉईड किंवा हायपोथायरॉईडची समस्या उद्भवते. त्यामुळे अनेक आजार सुद्धा उद्भवू शकतात. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे, फेशियल हेअरची वाढ, केस गळणे, सूज येणे, मासिक पाळी अनियमित होणे, शरीर दुखणे, थकवा, अशक्तपणा, मानसिक समस्या उद्भवू लागतात. थायरॉईड कार्य सुधारण्यासाठी मानेची मालिश खूप प्रभावी असते. विशेषत: अक्रोड तेलाने मसाज केल्याने थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते. यामुळे चेहऱ्यावर चमकही येते. या खास तेलाने मानेची आणि चेहऱ्याची मालिश कशी करायची ते जाणून घ्या.
अक्रोड तेलात सेलेनियमचे प्रमाण चांगले असते, जे थायरॉईड ग्रंथीसाठी आवश्यक असते. सेलेनियमच्या मदतीने थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे होते आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. म्हणून अक्रोड तेल थायरॉईड ग्रंथीचे बिघडलेले कार्य सुधारण्यास मदत करते.
थायरॉईडच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी अक्रोड तेलाचे दोन ते तीन थेंब तळहातावर घेऊन मानेवर लावा. नंतर तळवे घासून उबदार करा आणि दोन्ही हातांनी मान खांद्याच्या वरती धरा आणि सुमारे २ ते ३ मिनिटे सर्कुलर करत हाताच्या मागील बाजूस हलक्या हाताने मालिश करा. अक्रोड तेलाने दररोज मसाज केल्याने थायरॉईडची समस्या दूर होण्यास मदत होणार नाही. उलट त्यामुळे थायरॉईडचा धोकाही कमी होईल. याशिवाय मानेवरील सुरकुत्या थांबतील आणि त्वचा घट्ट होईल.
चेहऱ्याची डल स्किन चमकदार बनवण्यासाठी मानेला मसाज केल्यानंतर तळहातावर खोबरेल तेलाचा एक थेंब घ्या. त्यानंतर तळवे हलकेच घासून हात गालाच्या खालच्या भागापासून वरच्या बाजूस चोळा. लक्षात ठेवा की मसाज करताना खूप हलक्या हातांनी मसाज करावा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या