मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hypothyroid Symptoms: सामान्य वाटणाऱ्या या गोष्टी असू शकतात थायरॉईड कमतरतेची लक्षणं, करू नका दुर्लक्ष

Hypothyroid Symptoms: सामान्य वाटणाऱ्या या गोष्टी असू शकतात थायरॉईड कमतरतेची लक्षणं, करू नका दुर्लक्ष

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2024 12:31 PM IST

Thyroid Awareness Month: महिलांना हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक आजार होऊ लागतात. थायरॉईड हार्मोनच्या कमतरतेमुळे ही अतिशय सामान्य लक्षणे शरीरात दिसून येतात. जे वेळेवर ओळखणे महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नये.

थायरॉईड कमतरतेची लक्षणं
थायरॉईड कमतरतेची लक्षणं (pexels)

Common Symptoms of Hypothyroidism: थायरॉईडची कमतरता म्हणजे हायपोथायरॉईड, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी हार्मोन्सचे उत्पादन कमी करतात. यामुळे शरीरात काही अगदी सामान्य लक्षणे किंवा चिन्हे दिसतात. परंतु या लक्षणांकडे सतत दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू लागते. थायरॉईडच्या कमतरतेची समस्या म्हणजे हायपोथायरॉईडीझमची समस्या जीवनशैलीत बदल करून दुरुस्त केला जाऊ शकतो. साधारणपणे ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. जर शरीरात अशा समस्या उद्भवत असतील तर ते हायपोथायरॉईडची समस्या असल्याचे लक्षण आहे. याचे वेळीच निदान करून उपचार करता येतात. दुर्लक्ष करू नये असे शरीरात दिसणारे लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.

हायपोथायरॉईडीझमची लक्षणे

खूप थंडी जाणवणे

जर तुम्हाला कोल्ड सेंसेटिव्हिटी असेल आणि इतर लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवत असेल तर हे थायरॉईड हार्मोन्सच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.

घशात सूज येणे

थायरॉईड ग्रंथी सुजते आणि घशात स्पष्टपणे दिसू लागते. तसेच जर घशातून आवाज काढणे कठीण होत असेल किंवा आवाजाचा स्वर बदलत असेल आणि आवाज कमी झाला असेल तर ही हायपोथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.

स्मरणशक्ती कमी होणे

बोलत असताना काही गोष्टी विसरणे, एकाग्रता आणि कामावर लक्ष केंद्रित न करणे किंवा तुम्ही काय विचार करत आहात ते विसरून दुसरे काहीतरी करायला सुरुवात करणे असे होत असेल तर ही सर्व लक्षणे हायपोथायरॉईडीझमची असू शकतात.

विश्रांतीनंतरही थकवा येणे

पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर त्याला हलक्यात घेऊ नका. ही लक्षणे थायरॉईड हार्मोन्सच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

वजन वाढणे

योग्य आहार आणि नियमित व्यायाम करूनही वजन वाढत असेल तर थायरॉईडची तपासणी करा. याशिवाय अजून काही गोष्टी आहेत जे थायरॉईड हार्मोन्स कमी झाल्याचे सांगतात

 

- त्वचा आणि केस पूर्णपणे कोरडे आणि निर्जीव होणे.

- बद्धकोष्ठतेची समस्या सतत त्रास देत असेल आणि आतड्याची हालचाल चांगली नसणे.

- जर स्नायू आणि सांधेदुखत राहिल्यास, ही लक्षणे थायरॉईड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेची असतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel