Saurav Ganguly Nagma Love Story: बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्यामध्ये आधीपासूनच खूप घट्ट नातं आहे. एकीकडे क्रिकेटवर अनेक चित्रपट बनले असताना, दुसरीकडे अनेक नायिकाही क्रिकेटपटूंना डेट करताना दिसून येतात. काही नायिकांनी क्रिकेटर्सशी लग्न करत संसार थाटला. यामध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहलीपासून ते हरभजन सिंग आणि गीता बसरा यांचा समावेश होतो. अभिनेत्रीचं क्रिकेटर्सशी अफेअर असल्याच्या चर्चा या काही आता नवीन नाहीत. त्यातील काही चर्चा लग्नापर्यंत पोहोचल्या तर काहींचे नाते मध्येच तुटले. असेच एक नाते होते अभिनेत्री नगमा आणि सौरव गांगुली यांच्यात. फार कमी लोकांना माहित असेल की नगमा आणि सौरव गांगुली एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. परंतु मध्येच या दोघांचा ब्रेकअप झाला होता.
साऊथ आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री नगमाने अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबतचे नाते आणि ब्रेकअप याविषयी सांगितले होते. नगमाने हेही सांगितले होते की, तिचे आणि सौरव गांगुलीचे नाते का तुटले? याबद्दल जाणून घेण्यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया.
अभिनेत्री नगमाचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी आहे. आईच्या सांगण्यावरून ती अभिनय क्षेत्रात आली होती. नगमाने 1990 मध्ये सलमान खानच्या 'बागी: अ रिबेल फॉर लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट ठरला होता. तिच्या हिट डेब्यूनंतर, नगमाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पण 1999 पासून नगमाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली. याकाळात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव नगमासोबत जोडले जाऊ लागले होते.
नगमा आणि सौरव गांगुली यांच्या अफेअरची चर्चा 1999 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान दोघांची भेट झाली तेव्हापासून सुरू झाली. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. नगमा आणि सौरव गांगुली खूप वेळ एकत्र घालवायचे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. मात्र नगमा आणि सौरव गांगुलीने हे प्रकरण जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले. कारण त्यावेळी सौरव गांगुलीचे लग्न झाले होते. पण तरीही तो अभिनेत्री नगमाच्या प्रेमात पडला होता.
रिपोर्ट्सनुसार, एकदा नगमा आणि सौरव गांगुली एका मंदिरात एकत्र दिसले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. नगमा आणि सौरव गांगुली यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या अफवा उठू लागल्या. त्यांच्या अफेअरची बातमी सौरव गांगुलीची पत्नी डोनाच्या कानावर पोहोचली. रिपोर्ट्सनुसार, नगमा आणि सौरव गांगुलीच्या अफेअरच्या बातम्यांचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ लागला. 'पति, पत्नी आणि ती' या अँगलने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. हे देखील योग्य होते कारण सौरव गांगुलीने 1997 मध्ये डोनाशी लग्न केले होते. आणि त्याने कुटुंबाच्या विरोधात जाऊन हे लग्न केले होते. डोना ही सौरव गांगुलीची बालपणीची मैत्रीण होती.
ब्रेकअपनंतर नगमाने एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने सौरव गांगुलीसोबतचे नाते आणि ब्रेकअप याबद्दल स्फोटक खुलासे केले होते. सौरव गांगुलीसोबतचे नाते का तुटले हे नगमाने सांगितले होते. 2003 मध्ये सॅव्ही नावाच्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत नगमाने सौरव गांगुलीचे नाव न घेता म्हटले होते, 'कोणी काहीही म्हणो, पण कोणीही काहीही नाकारले नाही. जोपर्यंत एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांचे अस्तित्व नाकारता येत नाही तोपर्यंत कोणीही काहीही बोलू शकते. बाकी सगळ्यांशिवाय कुणाचं करिअर पण धोक्यात होतं. त्यामुळे विभक्त होणे आवश्यक होते. म्हणून विभक्त झालो'. असे म्हणत नगमाने आपल्या ब्रेकअपचा खुलासा केला होता.