Healthy Soup Recipe: थंडीचा सीजन सुरु आहे. यामध्ये अनेक आजार होतात. या सिजनमध्ये अनेक समस्या होतात. थंडीच्या सिजनमध्ये घसा खवखवणे आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा सूपबद्दल सांगणार आहोत, जे पिऊन तुम्ही या ऋतूमध्ये तुमची कमी प्रतिकारशक्ती देखील मजबूत करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही जास्त विशेष गोष्टींची गरज नाही. या रेसिपीला लागणाऱ्या सर्व भाज्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळतील. चला जाणून घेऊयात हेल्दी सूप कसं बनवायचं ते..
बीटरूट - ३ते ४
गाजर - २ ते ३
लिंबू रस - २ टीस्पून
आले - ४ लहान तुकडे
तूप - १ टेबलस्पून
पाणी - ५०० मिली
हळद - १ टीस्पून
काळी मिरी - १ टीस्पून
बडीशेप - २ टीस्पून
मीठ - चवीनुसार
> बीटरूट आणि गाजरचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करा.
> कढईत तूप गरम करून त्यात आले व इतर मसाले टाका. यानंतर २ मिनिटे शिजवा.
> आता या मसाल्यांमध्ये गाजर आणि बीटरूट पाण्यासोबत घाला.
> या प्युरीमध्ये मीठ घालून १५ मिनिटे शिजवा.
> यानंतर, १-२ उकळल्यानंतर, ते गाळून घ्या, नंतर सूप पुन्हा पॅनमध्ये घ्या. छान शिजू द्या.
> यानंतर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या