मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: या एका चुकीमुळे संसाराचा होतो नाश, जाणून घ्या चाणक्य नीती!

Chanakya Niti: या एका चुकीमुळे संसाराचा होतो नाश, जाणून घ्या चाणक्य नीती!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 26, 2024 10:26 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chankya Niti in Marathi: आचार्य चाणक्य यांना कोण ओळखत नाही. चाणक्य म्हणजे भारतीय इतिहासातील महान तत्त्वज्ञ, सल्लागार आणि शिक्षक. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा माणूस आजही जीवनात यशस्वी होतो. त्यांनी विविध पैलूंवर भाष्य केले आहे. अनेक नाते संबंधावर चाणक्य यांनी चाणक्य नीतीमधून सांगितलं आहे. चाणक्य नीतिशास्त्रानुसार पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात. या नात्यात एकाने जरी चूक केली तर संसार मोडू शकतो. आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच्या मधुर नात्यावर कुटुंबातील सुख-शांती अवलंबून असते. ज्या घरात पती-पत्नीच नातं ठीक नसते तिथे अगदी लक्ष्मीही वास करत नाही, असे म्हणतात. याच कारणांमुळे पती-पत्नीने काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्याने काही सल्ला दिला आहे. हा प्रयत्न करून तुम्ही तुमचे नाते आणखी सुधारू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

> चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जिथे लोक एकमेकांचा आदर करत नाहीत तिथे लग्न कधीही टिकत नाही. कारण जिथे आदर नाही तिथे प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही. लक्षात घ्या अशा लग्नात कोणीही सुखी नाही. आदर न केल्याने दोन व्यक्ती आयुष्यभर सुखी राहू शकत नाहीत. पती-पत्नी एकमेकांचा आदर करत नसतील, एकमेकांना अनादर करत असतील तर अशा लग्नाला काही अर्थ नाही.

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

> आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे जोडीदार एकमेकांची काळजी घेत नाहीत ते नाते फक्त नावापुरतेच असते. अशा नात्यात सर्व काही घडते पण प्रेम नसते. हे नातं फसवणुकीचं वाटतं. दोन्ही जोडीदार एकमेकांना फसवतात.

Chanakya Niti: आयुष्यात मोठी झेप घ्यायची आहे? चाणक्याचे हे शब्द लक्षात घ्या!

> पती-पत्नी दोघांपैकी एकाने विवाहाबाहेर अवैध संबंध ठेवले तर वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो.

> जेव्हा जोडीदार एकमेकांचा आदर करत नाहीत, तेव्हा ते सहाजिकच प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांपासून लपवतात. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर असतो. त्यामुळे पती-पत्नीने प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगावी. दोघांनी एकमेकांपासून काही गोष्टी लपवल्या तर हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे लग्न मोडते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel

विभाग