मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thick Eyebrows: या तेलाने पातळ भुवया होतील जाड आणि काळ्या, जाणून घ्या बनवण्याची प्रोसेस!

Thick Eyebrows: या तेलाने पातळ भुवया होतील जाड आणि काळ्या, जाणून घ्या बनवण्याची प्रोसेस!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 18, 2024 12:04 PM IST

How to get thick eyebrows: जर तुम्हालाही जाड आणि काळ्या भुवया हव्या असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

This oil will turn thin eyebrows thick and black
This oil will turn thin eyebrows thick and black (freepik)

Beauty Tips: जाड आणि काळ्या भुवया सगळ्यांनाच हव्यात. भुवया हा आपल्या चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे चेहरा खुलून दिसतो. या भुवया छान नसतील जाड आणि भरलेल्या नसतील तर छान वाटतं नाही. अनेकजण याबद्दल वारंवार तक्रार करतात. वास्तविक, पातळ भुवयांचा आकार छान दिसत नाही. चेहराही तितकासा चांगला दिसत नाही. म्हणूनच मुली जाड आणि दाट भुवयांना काजलने काळे करणे यासारख्या अनेक पद्धती वापरतात, परंतु हे सर्व उपाय तात्पुरते असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही जाड आणि काळ्या भुवया हव्या असतील तर तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहायला पाहिजेत. यामुळे तुमच्या भुवया काही दिवसातच जाड आणि काळ्या दिसायला लागतील.

लागणारे साहित्य

अक्रोड, रोझमेरी तेल, पेट्रोलियम जेली, व्हिटॅमिन ई तेल, एरंडेल तेल

Glowing Face Home Remedies: या सोप्या फॉर्मुलाचा करा अवलंब, येईल चेहऱ्यावर चमक!

जाणून रेसिपी

आयब्रो मास्क बनवण्यासाठी मेणबत्तीवर अक्रोड पकडून पूर्णपणे जाळून टाका. अक्रोड जळल्यावर एका भांड्यात घ्या आणि बेलण्याने खूप छान बारीक वाटून घ्या. त्यानंतर, त्यात व्हिटॅमिन ई तेल मिसळा. पुढे त्यात ८ ते १० थेंब रोझमेरी आवश्यक तेल आणि एरंडेल तेल घाला. रोझमेरी वनस्पती केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यानंतर या मिश्रणात थोडी पेट्रोलियम जेली घाला. हे सर्व साहित्य चांगले मिसळा. आता हे मिश्रण बाहेर काढून बंद डब्यात ठेवा. तुमचा आयब्रो मास्क तयार आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर लावा.

Beauty Tips: रोज सकाळी यापैकी एक पेय प्या, होईल वजन कमी, उजळेल चेहरा!

काय फायदे मिळतील?

भुवयांची वाढ फास्ट होईल.

हा मास्क लावल्याने भुवया जाड आणि काळ्या होतील.

लक्षात घ्या सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्हाला ते नियमितपणे वापरावे लागेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग