आजकाल केसांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. केस गळणे, लवकर पांढरे होणे, टक्कल पडणे आणि कोरडे व निर्जीव होणे अशा समस्या अगदी लहान मुलांनाही आहेत. खाण्यापिण्याच्या सवयीचा आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. हिवाळ्यात कोरडे आणि निर्जीव केस झपाट्याने गळू लागतात. काही लोकांचे केस वयाच्या आधी पांढरे होतात, तर काहींना टक्कल पडण्याची समस्या भेडसावत असते. फुटीच्या समस्याही वाढत आहेत. केसांना तेलाने मसाज न करणे हे असं होण्यामागचं एक कारण आहे. जाणून घ्या केसांच्या मसाजसाठी कोणते तेल उत्तम आहे.
बदामाचे तेलही केसांसाठी फारच चांगले असते. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते. याचा फायदा केस मजबूत होण्यास होते. बदामाच्या तेलाने केस घट्ट आणि मजबूत होतात.
जोजोबा तेल तर आवर्जून केसांना लावावे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांच्या सर्व समस्या दूर करतात. जोजोबा तेल टाळूचे पोषण करतात. हे तेल लावल्याने कोरडे, निर्जीव आणि खराब झालेले केस ठीक होतात.
खोबरेल तेल तर सर्वत्र वापरले जाते. यामध्ये पोषक आणि मुबलक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. खोबरेल तेल लावल्याने टाळूपर्यंत पोषक द्रव्ये पोहोचतात. हे तेल हलके असल्यामुळे केसांना जडपणा जाणवत नाही. खोबरेल तेलाने कोंड्याची समस्याही दूर होते.
ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी तर फायदेशीर असतेच. याशिवाय हे तेल केसांच्या मसाजसाठी चांगले मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे केसांसाठी फायदेशीर असतात. याने केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या देखील कमी होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या