मधुमेह व्यवस्थापन केवळ ठरलेली औषधे घेण्यापुरते मर्यादित नाही तर निरोगी लाइफस्टाइलचे देखील नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवू शकता. या नवीन वर्षात, निरोगी सवयी लावणे गरजेचे आहे. अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की उत्तम लाइफस्टाइल मधुमेहावरील रामबाण उपाय आहे. ज्यांची सक्रिय जीवनशैली नसते त्यांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. जंक फूड खाणे, उशीरा जेवण करणे आणि जेवणानंतर लगेच झोपणे यासारख्या लाइफस्टाइल मधील सवयी हा धोका आणखी वाढवू शकतात.
"मी ५ वर्षांपासून मधुमेहाच्या रूग्णांसह काम करत आहे. १,००० हून अधिक मधुमेही रुग्णांचा सल्ला घेतल्यानंतर आणि त्यापैकी ९६% पेक्षा जास्त लोकांमध्ये सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर, मी आपल्याला खात्री देऊ शकते की या ५ गोष्टी टाळल्यास आपल्या साखरेची पातळी १५ दिवसात कमी होण्यास मदत होईल," डॉ. डिक्सा भावसार सावलिया यांनी नुकत्याच आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
जर आपण अशी व्यक्ती असाल जी आपला दिवस कमी किंवा कोणताही व्यायाम न करता बसून किंवा झोपण्यात घालवत असेल तर आपल्याकडे निष्क्रिय किंवा गतिहीन लाइफस्टाइल आहे. अशी लाइफस्टाइल असलेल्या लोकांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. डॉ. सावलिया नियमित ४० मिनिटे हालचाल करण्याचा सल्ला देतात. चालणे, सायकल चालवणे, कार्डिओ किंवा योगा करणे हे असावे.
मधुमेहीसाठी प्रत्येक जेवणाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे कारण ते रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात मोठी भूमिका बजावू शकते. पांढरी साखर, मैदा, कच्चा ड्रायफ्रुट्स, दही आणि ग्लूटेन खाल्ल्याने व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असते, असे डॉ. सावलिया सांगतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी फळे आणि भाज्यांमधील नैसर्गिक साखरेला परवानगी आहे. गायीचे दूध आणि तूप यांचे सेवन कमी प्रमाणात करता येते. ज्वारी, नाचणी, आमरी यांसारख्या बाजरीचे सेवन करावे.
रात्री उशीरा जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. "लवकर रात्रीचे जेवण करणे हा आपल्या साखरेची पातळी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. शक्य असल्यास सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करणे चांगले. कामाचे वेळापत्रक पॅक असेल, तर रात्री ८ वाजेपर्यंत जेवण करणे चांगले," डॉ. सावलिया सांगतात.
" साखरेची पातळी जास्त असलेल्या लोकांसाठी दिवस-झोप घेण्यास सक्त मनाई आहे. यामुळे शरीरात कफदोष अधिक वाढतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते आणि म्हणून १००% टाळावे. रात्रीही तीन तासांच्या जेवणानंतर झोपण्याचा सल्ला दिला जातो," तज्ञ सांगतात.
डॉ. सावलिया म्हणतात की, निरोगी दिनचर्या न पाळणे आणि पूर्णपणे मधुमेहविरोधी मेडवर अवलंबून राहिल्यास लहान वयातच यकृत आणि मूत्रपिंड खराब होऊ शकते.c
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)