Summer Travel: पृथ्वीवरील स्वर्ग! उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी उत्तम आहे ही जागा!
जम्मू-काश्मीरपेक्षा उत्तराखंडमधील ही जागा सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही. उत्तराखंडच्या या सुंदर डेस्टिनेशनबद्दल जाणून घ्या.
Srinagar: पृथ्वीवरील स्वर्ग असं म्हंटल की आपल्या समोर जम्मू-काश्मीर येतं. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक सुंदर जागा आहेत. त्यातली श्रीनगर ही जास्त प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त अजून एक श्रीनगर देखील आहे. भारतात दोन श्रीनगर आहेत. पण बहुतेक लोकांना जम्मू-काश्मीरचे श्रीनगरच माहीत आहे. हे दुसरे श्रीनगर देवभूमी हे उत्तराखंडमधील आहे. उत्तराखंडचे श्रीनगर देखील सौंदर्याच्या बाबतीत जम्मू-काश्मीरपेक्षा कमी नाही. पण, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरपेक्षा हे उत्तराखंडमधील कमी लोकप्रिय आहे. आज या उत्तराखंडच्या श्रीनगरबद्दल जाणून घ्या.
ट्रेंडिंग न्यूज
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बेस्ट जागा
> जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर उत्तराखंडचे श्रीनगर हे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी योग्य ठिकाण आहे. येथील व्हॅली व्ह्यू पॉईंट बघून तुमचा ताण दूर होऊ शकतो.
Travel Tips: महाराष्ट्रातलं हे ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही! नक्की द्या भेट
> नयनरम्य दृश्ये आणि हिरवेगार वातावरण पाहून तुम्हाला येथून जाण्याची इच्छाही होणार नाही.
> येथील कीर्तीनगर गावही कमी सुंदर नाही. श्रीनगरपासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेले कीर्तीनगर गाव आणि अलकनंदा नदीचे दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
Hill Stations Near Nasik: नाशिकच्या आजूबाजूला फिरण्यासाठी ही ५ सुंदर हिल स्टेशन्स!
> इथली बर्फवृष्टीमध्ये येथील दृश्य अधिक विलोभनीय बनते. जर तुम्ही बर्फवृष्टीच्या काळात हे शहर फिरायला जात असाल तर तुम्हाला येथे एक चांगला अनुभव मिळणार आहे.
> देवीच्या भक्तांसाठी येथे एक सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही मातेचे भक्त असाल तर तुम्ही धारी देवी मंदिराला अवश्य भेट द्या. असे म्हटले जाते की येथे देवीची मूर्ती दिवसातून तीन वेळा तिचे रूप बदलते.
Travel Tips: या देशाची करू शकता बजेट फ्रेंडली ट्रिप!
> निसर्गप्रेमींनाही नौर ही जागा खूप आवडेल. इथले हवामान तुम्हाला राहण्यास भाग पाडेल. श्रीनगरसारख्या ठिकाणी तुम्हाला मंदिरांपासून निसर्गापर्यंत सर्वच गोष्टींचा अद्भुत अनुभव मिळणार आहे.