मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: 'या' घटना तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकते!
चाणक्य नीती
चाणक्य नीती

Chanakya Niti: 'या' घटना तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकते!

18 March 2023, 8:55 ISTTejashree Tanaji Gaikwad

Acharya Chanakya: चाणक्य नीतीमध्ये अशा काही घटना सांगितल्या आहेत ज्यामुळे मनुष्याचे जीवन दुःखी बनू शकते.

Chanakya Niti: माणसाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे चक्र नेहमीच सुरु असते. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये अशा काही घटनांचा उल्लेख केला आहे ज्यामुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. यामुळे लोक नेहमी दुःखी राहतात. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल सांगितले आहे. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. चाणक्य नीतीमध्ये अशा काही घटना सांगितल्या आहेत ज्यामुळे मनुष्याचे जीवन दुःखी बनू शकते. जाणून घेऊया काय आहेत या घटना.

ट्रेंडिंग न्यूज

आयुष्याचा जोडीदार गमावणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, जोडीदाराचं हे असं नातं आहे जे आयुष्यभर टिकते. पण पती-पत्नीपैकी एकच टिकले नाही तर जगणे फार कठीण होऊन बसते. वृद्धापकाळात अनेक समस्या येतात. जीवन दु:खाने भरलेले आहे.

जमा पूंजी गमावणे

आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी पैसा असणे खूप महत्वाचे आहे. जर काही कारणास्तव तुमची जीवनाची पुंजी गेली तर तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. गरज पडेल तेव्हा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.

कोणाच्या घरात राहणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव दुसऱ्याच्या घरात राहावे लागत असेल तर ती अशुभाची बाब आहे. त्यामुळे व्यक्ती इतरांवर अवलंबून राहते. त्याला इतरांच्या इच्छेनुसार जगावे लागते. यामुळे व्यक्तीचा स्वाभिमान नष्ट होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. )

 

 

विभाग