Burn Belly Fat: पोटाची हट्टी चरबी होईल कमी, फक्त रोज सकाळी प्या हे ड्रिंक, फॉलो करा या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Burn Belly Fat: पोटाची हट्टी चरबी होईल कमी, फक्त रोज सकाळी प्या हे ड्रिंक, फॉलो करा या टिप्स

Burn Belly Fat: पोटाची हट्टी चरबी होईल कमी, फक्त रोज सकाळी प्या हे ड्रिंक, फॉलो करा या टिप्स

Jul 08, 2024 10:20 AM IST

Fat Burning Drink: बहुतेक लोक त्यांच्या सुटलेल्या पोटामुळे त्रस्त असतात. जर तुमच्या पोटावरही चरबी जमा झाली असेल तर ती कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करण्याची वेळ आली आहे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स
पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Get Rid of Stubborn Belly Fat: पोटावर जमा झालेली चरबी कमी करणे काही लोकांसाठी कठीण असू शकते. काही लोक असे असतील ज्यांनी अनेक वेळा ते कमी करण्याचा प्रयत्न केला असेल. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार करता आणि शून्य रिझल्ट मिळतो, तेव्हा तुम्हाला ते काम करावेसे वाटत नाही. वजन कमी करताना किंवा पोटाची चरबी कमी करताना हीच गोष्ट घडते. पोटाची चरबी कमी करायची असेल तर फक्त जेवण कमी करणं पुरेसं नाही, हे समजून घ्यायला हवं. त्याऐवजी पोट कमी करण्यासाठी चयापचय चांगलं असायला हवं. आम्ही चयापचय वाढविण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करणाऱ्या काही टिप्स आणि ड्रिंक्स बद्दल सांगत आहोत. हे तुमची पोटावरील हट्टी चरबी कमी करण्यास मदत करेल.

बेली फॅट कमी करण्यास मदत करतील या टिप्स

- ऑफिसचं काम करत असताना तासन् तास एकाच जागेवर बसू नका. दर अर्ध्या तासाने आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करा आणि थोडा वेळ चालण्याचा किंवा स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमची चयापचय क्रिया चांगली होते.

- दररोज कमीत कमी ३० मिनिटे चालावे. असे केल्याने आपल्या कॅलरी बर्न होतील तसेच वजन ही कमी होईल.

- मॉलमध्ये किंवा ऑफिसमध्ये जाता तेव्हा लिफ्टऐवजी पायऱ्या चढून जाण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवू शकाल. यामुळे पोटाची चरबीही झपाट्याने कमी होईल.

- स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी आणि पोटाची चरबी वेगाने कमी करण्यासाठी, आपल्या रुटीनमध्ये काही व्यायामांचा समावेश करा. प्लँक, सीट अप सारखे व्यायाम पोट कमी करण्यास खूप मदत करतात.

- रोज काही योगासने केल्यास देखील पोटाची चरबी बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. डेली रुटीनमध्ये कोनासन, उष्ट्रासन, धनुर्वक्रासन करू शकता. सुरवातीला ही आसने करणे अवघड वाटू शकते. परंतु जसजसे आपण दररोज ते करण्यास सुरवात कराल तसतसे आपल्याला ही आसने सोपी वाटतील.

बेली फॅट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक प्यावे?

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण आपल्या डेली रुटीनमध्ये ड्रिंकचा समावेश करू शकता. हे बनवण्यासाठी तुम्हाला अॅपल साइडर व्हिनेगर, पुदिन्याची पाने, चिया सीड्स, पाणी आणि आल्याचा रस आवश्यक आहे. हे तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल साइडर व्हिनेगर, एक चमचा भिजवलेले चिया सीड्स, ४ ते ५ पाने पुदिना आणि एक चमचा आल्याचा रस मिसळा. चांगले मिक्स केल्यानंतर हे सकाळी रिकाम्या पोटी प्या. जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पिणे शक्य नसेल तर मॉर्निंग स्नॅकिंगच्या वेळी प्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner