मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Night Shift: रात्रीच्या शिफ्टमध्ये हा निष्काळजीपणा तुम्हाला पाडू शकतो आजारी!

Night Shift: रात्रीच्या शिफ्टमध्ये हा निष्काळजीपणा तुम्हाला पाडू शकतो आजारी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 17, 2023 10:16 PM IST

Health Care: आजकाल नाईट शिफ्ट कल्चर झपाट्याने वाढत आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये निरोगी राहण्यासाठी, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Healthy Lifestyle Tips
Healthy Lifestyle Tips (Freepik)

Night Shift Work: आजकाल लोकांची जीवनशैली फारच वाईट झाली आहे. त्यात फारच चेंजेस झाले आहेत. वाढत्या कामाचा ताणही लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. अजूनही अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम आहे. यामुळे सहाजिकच रात्रीच्या शिफ्टही मोठ्या प्रमाणात केल्या जातात. रात्री उशिरापर्यंत काम केल्यामुळे अनेकदा लोक अनेक समस्यांना बळी पडू लागतात. अशा परिस्थितीत कामासोबतच आरोग्याची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यासाठी काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चांगली झोप घ्या

रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करताना अनेकदा झोप येते. हे झोपेच्या कमतरतेमुळे होते. जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर दिवसा चांगली आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही कामावर लक्ष केंद्रित कराल आणि आजारी पडणे देखील टाळाल.

हायड्रेटेड रहा

निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल, तर लक्षात ठेवा की तुम्ही दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या, जेणेकरून तुम्ही रात्रभर हायड्रेटेड राहू शकाल. हे तुम्हाला तुमच्या शिफ्ट दरम्यान जागृत राहण्यास मदत करते आणि तुमची एकाग्रता सुधारते.

निरोगी आहाराचे पालन करा

जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सुका मेवा, आरोग्यदायी फळे आणि भाज्यांचा समावेश करू शकता. रात्रीच्या जेवणात जड अन्न खाणे टाळा, कारण यामुळे तुम्हाला झोप येते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

वेळोवेळी ब्रेक घ्या

स्क्रीनसमोर सतत बसल्याने तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही रात्री काम करत असाल तर मधेच ब्रेक घ्या. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि काम केल्यासारखे वाटेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कॉफी पिऊ शकता किंवा तुमच्या स्नायूंना आराम देण्यासाठी काही स्ट्रेचिंग करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel