Car Care Tips: 'या' वस्तू आपल्या गाडीत अजिबात ठेवू नका, कधीही घेऊ शकतात पेट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Car Care Tips: 'या' वस्तू आपल्या गाडीत अजिबात ठेवू नका, कधीही घेऊ शकतात पेट

Car Care Tips: 'या' वस्तू आपल्या गाडीत अजिबात ठेवू नका, कधीही घेऊ शकतात पेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 08, 2024 05:14 PM IST

Car Care Tips: आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सहसा आपल्या कारमध्ये ठेवता. पण त्यांच्यामुळे तुमच्या गाडीला मोठी हानी होऊ शकतो. चला जाणून घेऊया अशा वस्तूंविषयी...

Things we should keep in car otherwise they can cause fire and blast
Things we should keep in car otherwise they can cause fire and blast (shutterstock)

कारला आग लागण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. अलीकडच्या काळात अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात असे अपघात दुप्पट होतात. अनेकदा शॉर्टसर्किट किंवा इतर अनेक तांत्रिक कारणांमुळे हे अपघात होतात, पण काही वेळा इतर काही कारणेही याला कारणीभूत असतात. होय, कधी कधी आपण अशा काही गोष्टी गाडीत ठेवतो, ज्यामुळे नंतर मोठा अपघात होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही अनेकदा विचार न करता आपल्या कारमध्ये ठेवता. पण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका असतो.

प्लास्टिकची बाटली गाडीत ठेवू नका

गाडीत पाणी पिण्यासाठी आपण अनेकदा प्लास्टिकच्या बाटल्या ठेवतो. एक ना एक बाटली आमच्या गाडीत पडून असते. पण प्लास्टिकच्या या छोट्या बाटल्यांमुळे तुमच्या कारमध्ये मोठा अपघात होऊ शकतो. विशेषतः उन्हाळ्यात या बाटल्या अजिबात गाडीत ठेवू नका. प्लॅस्टिकच्या बाटल्यांना आग लागण्याची शक्यता असते. जर एखादी बाटली जळाली तर त्यामुळे संपूर्ण कार पेट घेऊ शकते. नेहमी स्टील किंवा काचेची बाटली वापरा.
वाचा: फास्ट फूडचे शौकीन आहात? घरच्या घरी एगलेस मेयोनीज बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

याशिवाय अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या कारमध्ये ठेवणे टाळले पाहिजे. सिगारेट पेटवण्यासाठी लाइटर चा वापर करत असाल तर सावधगिरी बाळगायला हवी. गाडीत कधीही लाईटर सोडू नका. खरं तर लाइटरवर सूर्यप्रकाश पडला तर मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे कारला आग लागू शकते.
वाचा: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवरच फिरताय? होऊ शकतो 'हा' त्रास! 'अशी' घ्या काळजी

* कारमध्ये सुगंधासाठी डिओड्रेंट ठेवणे टाळावे. हे तापमान संवेदनशील आहे, म्हणजेच तापमान किंचित वाढले तरच स्फोटाचा धोका असतो.

* गाडीत सॅनिटायझर ठेवू नका. सॅनिटायझर ठेवल्याने वाहनाला आग लागण्याचा धोकाही वाढतो. विशेषत: सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यास ते अजिबात सोडू नका.
वाचा: तुमचा आवडता रंग तुमच्याविषयी अनेक गोष्टी सांगून जातो, जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

* या सर्व गोष्टींबरोबरच आपल्या कारमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठेवणे टाळा. खरं तर उन्हाळ्यात या उपकरणांना आग लागण्याचा धोकाही खूप जास्त असतो. थोडीशी चूक मोठ्या अपघाताचे रूप धारण करू शकते.

Whats_app_banner