Yoga Mantra: हिप्स फॅट कमी करायचंय? मदत करतील हे योगासन
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: हिप्स फॅट कमी करायचंय? मदत करतील हे योगासन

Yoga Mantra: हिप्स फॅट कमी करायचंय? मदत करतील हे योगासन

Published Feb 22, 2024 08:03 AM IST

Yoga for Fat Loss: शरीरावर जमा झालेली चरबी कमी करणे अवघड काम असते. तुम्हाला हिप्स फॅट कमी करायचे असेल तर हे योगासन तुमची मदत करतील.

उत्कटासन
उत्कटासन (freepik)

Yoga Poses To Reduce Hips Fat: शारिरीक आणि मानसिक रित्या निरोगी राहण्यासाठी योगासन फायदेशीर आहेत. आरोग्याच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी योगासन प्रभावी ठरतात. तसेच ते ताण तणाव कमी करून मनःशांती मिळवण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. एवढेच नाही तर योगासन आपल्याला वजन कमी करण्यसाठी आणि शरीरावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. पोट, मांड्या, नितंब यावर जमा झालेली चरबी आपले सौंदर्य खराब करते. तुम्हाला सुद्धा हिप्स फॅट कमी करायचे असेल तुम्ही या योगासनांची मदत घेऊ शकता.

विरभद्रासन

हे आसन पायांसाठी उत्तम आहे. सुरुवातीला हे आसन अगदी सोपे वाटू शकते. हे आसन त्या स्नायूंवर काम करते ज्याकडे आपण आपले रोजचे काम करताना लक्ष देत नाही.

उत्कटासन

हे आसन नितंब आणि मांड्यांचे स्नायू उत्तेजित करते. हे करण्यासाठी तुम्ही खुर्चीवर काल्पनिक पद्धतीने बसता, ज्यामुळे तुमच्या स्नायूंवर ताण येतो. तुमच्या शरीराचे वजन तुमच्या पायांवर, विशेषतः नितंब आणि मांड्यांच्या स्नायूंवर अवलंबून असते. हे केवळ तुमचे पाय टोन करत नाही तर स्नायू निर्माण करते आणि त्यांना मजबूत बनवते.

ब्रिज पोज

हिप फॅट कमी करण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे. हे केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो आणि नितंब आणि बट मजबूत होतात. हिप्स कमी करण्यासाठी तुम्ही दररोज याचा सराव केला पाहिजे.

मलासन

मलासन हे आणखी एक आसन आहे जे प्रामुख्याने पायांवर विशेषत: नितंब आणि मांड्यांवर काम करते. हे रक्त प्रवाह वाढवते आणि आपल्या नितंब आणि मांड्या मध्ये एक चांगला ताण निर्माण करते. हे तुमचे नितंब रुंद करते आणि तुमच्या पायाच्या स्नायूंना भरपूर ताकद आणि लवचिकता देते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner