मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: चाणक्याचे हे शब्द विद्यार्थ्यांसाठी ठरतील उपयुक्त, मिळेल इच्छित यश!

Chanakya Niti: चाणक्याचे हे शब्द विद्यार्थ्यांसाठी ठरतील उपयुक्त, मिळेल इच्छित यश!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 03, 2024 08:42 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्र लिहले. त्यात त्यांनी अनेक पैलूची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करून तुम्ही कोणत्याही समस्येतून बाहेर पडू शकता.आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थी जीवनाबद्दलही सविस्तर माहिती दिली आहे. चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी जीवन अनमोल आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबाबत गांभीर्याने वागले पाहिजे. निष्काळजीपणा, वाईट संगत आणि आळस यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सर्वाधिक नुकसान होते. चाणक्य नीतीनुसार विद्यार्थ्यांचे जीवन अनमोल आहे. अशा परिस्थितीत आज जाणून घेऊया चाणक्याच्या या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत...

शिस्त

विद्यार्थी जीवनात शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. शिस्तीचे अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी फारशी धडपड करावी लागत नाही. असे विद्यार्थी सहज आपले ध्येय साध्य करतात.

वेळेवर काम पूर्ण करा

कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी एक निश्चित वेळ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत.

वाईट गोष्टींचे व्यसन

आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थ्यांनी ड्रग्ज, दारू, सिगारेट सारख्या गोष्टींपासून दूर राहावे. कारण लक्षात घ्या वाईट सवयी यशात अडथळा ठरतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वाईट संगत टाळा

आपली मैत्री कोणासोबत आहे याचा खूप प्रभाव पडतो. कारण चुकीची संगत विद्यार्थ्याचा नाश करू शकते. विद्यार्थ्यांनी चांगले आणि खरे मित्र बनवले पाहिजेत.

आळस सोडून द्या

चाणक्य नीती म्हणते की आळस हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. अशा स्थितीत त्यापासून दूर राहिले पाहिजे. एकदा ध्येय निश्चित केले की ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel