Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि रणनीतीकार असण्याबरोबरच ते अर्थशास्त्रातेचेही जाणकार होते. आजही त्यांनी लिहलेल्या चाणक्य नीतीचा अबलांब समस्या टाळण्यासाठी करतात. चाणक्याच्या नीति शास्त्रामध्ये जीवनाच्या अनेक पैलूंच्या समस्यांशी संबंधित सूत्रे आहेत, ज्याचा अवलंब करून लोक त्यांच्या समस्या सोडवू शकतात. आज प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपल्या इच्छेनुसार यश मिळवायचे असते आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा तो जीवनाबद्दल निराशा वाटू लागते. चला जाणून घेऊयात माणूस यश कसे मिळवू शकतो ते.
व्यक्तीने भविष्यासाठी नेहमी पैशाची बचत केली पाहिजे. असे केल्याने कोणत्याही अडचणीचा सामना करता येऊ शकतो. त्यामुळे तुमचे पैसे नेहमी विचारपूर्वक खर्च करा. जेवढे जमते तेवढा पैसा वाचवा.
जे लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नकात. ज्यांना तुम्हाला दुःखात पाहून आनंद होतो अशा लोकांवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नये. अशी व्यक्ती तुम्हाला नक्कीच फसवतील.
सामान्यतः लोक त्यांच्या कमकुवतपणा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सांगतात ज्यामुळे फक्त दुःख होते. आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाने आपली कमजोरी कोणाला सांगू नये. असे केल्याने समोरची व्यक्ती ती कमजोरी कोणाच्याही समोर आणू शकते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांशी कधीही वाद घालू नये. असे केल्याने तुमचेच नुकसान होते. शिवाय, त्याचा तुमच्या प्रतिमेवरही वाईट परिणाम होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)