मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हाय बीपीसाठी रामबाण आहेत किचनमधील या गोष्टी, लगेच दिसतो फरक

हाय बीपीसाठी रामबाण आहेत किचनमधील या गोष्टी, लगेच दिसतो फरक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 27, 2023 08:42 PM IST

High Blood Pressure: उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील काही गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. येथे पाहा हाय बीपी नियंत्रित करणाऱ्या गोष्टी.

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फूड
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फूड (unsplash)

Foods to Lower Blood Pressure: जीवनशैलीतील चुकांमुळे हल्ली लोक लहान वयातच अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त होतात. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे हाय बीपी. या समस्येमुळे हृदय आणि मेंदूचेही नुकसान होते. जर एखाद्या व्यक्तीला हाय बीपीची समस्या असेल तर त्याने स्वतःची विशेष काळजी घ्यावी, तसेच आहारात बदल करावेत. येथे काही गोष्टी आहेत ज्या बीपी नियंत्रित करण्यास मदत करतात.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे (What to eat to keep blood pressure under control)

केळी

केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, यासोबतच त्यात मिनरल्स देखील असतात. अशावेळी केळी हाय बीपी नियंत्रित करण्यास मदत करते. पोटॅशियम सोडियमचा प्रभाव कमी करते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांच्या वॉल्समधील ताण कमी करते.

भोपळ्याच्या बीया

आजी अनेकदा भोपळ्याच्या बियाण्याचे अनेक फायदे सांगतात, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. भोपळ्याच्या बियांमध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात जी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आर्जिनिन असते, जे रक्तदाब कमी करण्यासाठी आवश्यक असतात.

पिस्ता

पिस्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिस्ता हे निरोगी रक्तदाब पातळीशी जोडलेले आहेत. पिस्त्यात पोटॅशियमसह इतर पोषक घटक असतात जे बीपी कमी करण्यास मदत करतात.

गाजर

गाजरमध्ये क्लोरोजेनिक, पी-कौमेरिक आणि कॅफीक अॅसिड सारखी फिनोलिक संयुगे असतात जी रक्तवाहिन्या आराम करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग