मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Married Relation: नात्यात दिसत असतील या गोष्टी तर भविष्यात निश्चित आहे घटस्फोट

Married Relation: नात्यात दिसत असतील या गोष्टी तर भविष्यात निश्चित आहे घटस्फोट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 24, 2023 09:45 PM IST

Couple Relationship: पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि विश्वासासोबतच आदरही खूप महत्त्वाचा आहे. या तिन्ही गोष्टी संपल्या की नात्यात घटस्फोट निश्चित होतो.

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स

Signs of Divorce in Relationship: वैवाहिक संबंध संपवण्याची वेळ अशीच येत नाही. अनेक वर्षे दुर्लक्ष आणि दुखावलेल्या भावना यात गुंतलेल्या आहेत. जे एकत्र जमतात आणि माणसाला आयुष्यातून बाहेर काढण्यास भाग पाडतात. अनेक संशोधनातून असेही समोर आले आहे की नात्यात दिसणारी काही चिन्हे भविष्यात घटस्फोटाची शक्यता असल्याचे सांगतात. चला तर मग जाणून घेऊया घटस्फोटाच्या रूपात तुमच्या नात्याचे भविष्य ठरवणारी कोणती चिन्हे आहेत.

Relationship Tips: आता नातं टिकणार नाही असं दिसतंय? तर या ५ मार्गांनी करा गुडबाय

क्रिटिसाइज करणे

पती-पत्नीमधील भांडणे सामान्य आहेत. पण जेव्हा जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वावर आणि चारित्र्यावरून भांडण वाढू लागते, तेव्हा समजून घ्या की हे नाते फार काळ टिकणार नाही. संशोधनात असे दिसून आले आहे की 'कधीही नाही' आणि 'नेहमी' असे काही शब्द आहेत जे दाखवतात की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या चारित्र्याकडे बोट दाखवत आहात. त्यावेळी होणार्‍या भांडणाचा मुद्दा बाजूला ठेवून चारित्र्यावर होणारी भांडणे हे नाते लवकरच संपणार असल्याचे सांगतात.

Married Life: वैवाहिक जीवनात येणाऱ्या या समस्या बिघडवू शकतात तुमचे नाते

हावभावातून हीन भावना दाखवणे

नात्यात आदर खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वैयक्तिक गोष्टींची खिल्ली उडवता, त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये स्वारस्य दाखवत नाही आणि त्याच्याकडे तुच्छतेने पाहतो. जोडीदाराच्या आयुष्यात त्याची किंमत नाही हे डोळ्यांनी दाखवून दिले जाते. मनात दडलेली अशी अवहेलना आणि अपमान एक दिवस स्फोटसारखा बाहेर पडतो आणि जोडीदार घटस्फोट घेण्याचा विचार करू लागतो.

Relation Goal: नात्यात या गोष्टी चुकनही ॲडजस्ट करु नये, होऊ शकतो पश्चाताप

जबाबदारी घेण्यास टाळणे

दीर्घकाळ जर तुम्ही तुमची जबाबदारी घेण्याचे टाळल्यास आणि प्रत्येक काम दुसऱ्यावर सोपवल्यास नात्यात दुरावा येतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत कारणं, एक्सप्लेनेशन देणे सुरु करता. त्यामुळे तुमच्या जोडीदारासाठी हे नकारात्मक लक्षण आहे. असे संबंध भविष्यात घटस्फोटाचे भविष्य निर्माण करतात.

Relationship Tips: नात्यात का महत्त्वाचा असतो गॅप, कधी द्यावा ते जाणून घ्या

मौन किंवा अबोला

मौन किंवा अबोला धरणे ही नात्यातील सर्वात धोकादायक गोष्ट आहे. भांडणात, कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्यासाठी तुम्ही गप्प बसता आणि काहीही बोलत नाही. अशा नात्यात प्रश्न सुटण्याऐवजी ते मनात अधिकच स्थिरावते. अशा वेळी भांडणे थांबली तरी मनात विष घोळू लागते आणि काही काळानंतर अशी नाती नक्कीच संपतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel