मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hangover: नवीन वर्षाच्या पार्टीनंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी कामी येतील हे उपाय!

Hangover: नवीन वर्षाच्या पार्टीनंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी कामी येतील हे उपाय!

Dec 31, 2023 11:39 PM IST

जर तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीत मद्यपान करणार असला तर आणि जर तुम्हाला आधीच हँगओव्हरची काळजी वाटत असेल तर असे उपाय जाणून घ्या ज्याचा अवलंब करून तुम्ही हँगओव्हरच्या लक्षणांपासून आराम मिळवू शकता.

Hangover home Remedies
Hangover home Remedies (Freepik )

Hangover: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही ३१ डिसेंबरला मोठी पार्टी करण्याचा विचार करात असला तर खाण्यापिण्याची, मजामस्तीची भरपूर सोय होते. ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्येही मद्यप्राशन केले जाते. या रात्री पार्टीमध्ये काही लोक मद्यपान करतात. जास्त मद्यपान केल्यामुळे, दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी खूप मोठा हँगओव्हर चढतो. या हँगओव्हरवर मात कसा करायचा समजत नाही. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या पार्टीपूर्वीच हँगओव्हरवर उपाय सांगत आहोत. ३१ डिसेंबर किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही जास्त मद्यपान केले असेल तर हे उपाय तुम्हाला खूप मदत करतील.

जाणून घ्या लक्षणं

होय, प्रथम आपल्याला हँगओव्हर आहे की नाही हे कळण्यासाठी त्याची लक्षणे जाणून घेऊयात.

डोकेदुखी

ट्रेंडिंग न्यूज

मळमळ

थकवा

डिहाइड्रेशन

हँगओव्हर उतरवण्याचे उपाय

हँगओव्हर हा असा आजार नाही ज्याला कोणत्याही उपचाराची गरज नाही. ही एक समस्या किंवा अस्वस्थता आहे, जी काही घरगुती उपायांनी बरी किंवा कमी केली जाऊ शकते. या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्ती सामान्य होणे सोपे होते.

संतुलित आहार घ्या

संतुलित आहार घेतल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करू शकता. याच्या मदतीने तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतात.

आल्याचे सेवन करा

मळमळ आणि पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा वापर केला जातो. आल्याचा चहा किंवा आले इतर कोणत्याही स्वरूपात घेतल्यास हँगओव्हरच्या वेळी मळमळ यासारख्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होते.

व्यायाम

हँगओव्हरमुळे डोकेदुखी आणि मळमळ यासारखी लक्षणे गंभीर असतात तेव्हा हलका व्यायाम केल्याने लक्षणांपासून आराम मिळू शकतो.

पुदिन्यापासून मिळेल शांती

पुदिन्यात असे गुणधर्म असतात जे डोकेदुखी आणि मळमळ यापासून आराम देतात. हँगओव्हरच्या बाबतीत, तुम्ही पुदिन्याचा चहा पिऊ शकता किंवा पुदिन्याचे तेल घेऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel