Kitchen Garden: किचन गार्डनमध्ये लावा हे ५ रोपं, स्वयंपाकात पडतील उपयोगी-these plants should be in your kitchen garden useful in cooking ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Garden: किचन गार्डनमध्ये लावा हे ५ रोपं, स्वयंपाकात पडतील उपयोगी

Kitchen Garden: किचन गार्डनमध्ये लावा हे ५ रोपं, स्वयंपाकात पडतील उपयोगी

Feb 26, 2024 10:42 PM IST

Kitchen Garden: जर तुम्हाला तुमच्या घरात किचन गार्डन बनवायचे असेल तर तुम्ही या ही ५ झाडे लावू शकता. ही झाडे अगदी सहज लावता येतात आणि स्वयंपाकातही वापरता येतात.

किचन गार्डन
किचन गार्डन (unsplash)

Plants for Kitchen Garden: तुम्ही तुमच्या किचनच्या बाल्कनीमध्ये किंवा थोडाशा जागेत काही रोपे लावू शकता. ही अशी रोपं आहेत ज्यांचा वापर भारतीय पदार्थ बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही घरी स्वतःचे किचन गार्डन बनवण्याचा विचार करत असाल, तर येथे अशी ५ झाडे आहेत जी घरी सहज लावता येतात. अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या किचन गार्डनमध्ये सहज लावता येतात, यासोबतच त्यांचा सुगंध जेवणाची चवही वाढवू शकतो. किचन गार्डनमध्ये तुम्ही कोणती ५ रोपं लावू शकता ते जाणून घ्या.

पुदिना

पुदिन्याचा उपयोग विविध प्रकारचे पदार्थ तयार करतांना केला जाऊ शकतो. हे अनेक प्रकारचे ड्रिंक गार्निश करण्यासाठी वापरले जाते. उन्हाळ्यात याचा भरपूर वापर होतो. अशा परिस्थितीत उन्हाळा येण्यापूर्वी या वनस्पतीची लागवड करा.

मिरची

मिरचीचे अनेक प्रकार आहेत, जे संपूर्ण भारतात घेतले जातात. घरच्या घरी हिरवी मिरची सुद्धा लावू शकता. मिरची लावण्यासाठी तुम्हाला मिरचीच्या बिया, भरपूर सूर्यप्रकाश आणि ओलसर मातीची आवश्यकता असेल.

कढीपत्ता

कढीपत्ता अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करणे, दृष्टी सुधारण्याची क्षमता, ताण कमी करण्याची क्षमता, केसांची वाढ इत्यादींसाठी याचा वापर केला जातो. हे तुम्ही एखाद्या कुंडीत सहज लावू शकता.

टोमॅटो

भाजीपासून ते चटण्या आणि सॅलडपर्यंत जवळपास सर्वच गोष्टींमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. हे स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सोबतच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे किचन गार्डनमध्ये लावण्यासाठी तुम्हाला टोमॅटोच्या काही बिया लागतील. याचे झाड खूप लवकर वाढते.

कोथिंबीर

पदार्थ गार्निश करणे असो वा चटणी बनवणे प्रत्येक घरात कोथिंबीरचा वापर केला जातो. हे फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. एखाद्या छोट्या कुंडीत कोथिंबीर लावणे खूप सोपे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग