
Side Effects of Eating too Many Oranges: आंबट गोड चवीचे संत्री खायला सगळ्यांनाच आवडते. संत्री केवळ चवीमुळेच नाही तर त्यामध्येअसलेल्या आरोग्यासाठी फायदेशीर पोषक घटकांमुळेही आवडीने खाल्ले जाते. व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक संत्र्यात आढळतात. यांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. आरोग्यासाठी बरंच फायदेशीर असूनही काही लोकांनी संत्र्याचं जास्त सेवन करणे टाळावे. संत्र्याचे सेवन केल्याने त्यांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. चला अशा लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी जास्त प्रमाणात संत्र्याचे सेवन टाळावे.
संत्र्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ किंवा अॅसिडिटी होऊ शकते. आंबटपणामुळे त्यात अॅसिडचे प्रमाण जास्त असते, ज्याच्या सेवनाने शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.
ज्या लोकांना आधीच किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी संत्र्याचे जास्त सेवन करू नये. अशा लोकांनी संत्री खाण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
संत्र्याचे जास्त सेवन केल्याने दातांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. संत्र्यामध्ये असलेले अॅसिड दातांच्या इनॅमलमध्ये असलेल्या कॅल्शियमसह एकत्रित होऊन बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीची समस्या उद्भवू शकते आणि दात हळूहळू खराब होऊ लागतात.
संत्र्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे व्यक्तीला अपचन, पोटात मुरड येणे आणि अतिसाराचा त्रास होऊ शकतो. लक्षात ठेवा एका दिवसात जास्तीत जास्त २ संत्री खावीत.
संत्र्याचा प्रभाव थंड असतो. अशा परिस्थितीत ज्यांना आधीच सांधेदुखी किंवा अर्थरायटिसचा त्रास आहे त्यांनी संत्र्याचे सेवन टाळावे. संत्र्याचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी, हाडे दुखण्याची समस्या वाढू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
