मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Immunity: रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी हे पौष्टिक घटक आहेत आवश्‍यक!

Immunity: रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी हे पौष्टिक घटक आहेत आवश्‍यक!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 12, 2024 03:55 PM IST

Nutrients: रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटकांचा समावेश असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

Immunity Booster
Immunity Booster (Freepik )

Foods to boost immunity: सर्वोत्तम रोगप्रतिकारशक्‍ती संपादित करण्‍याचे नववर्ष संकल्‍प स्‍थापित करत नववर्षाची उत्‍साहात सुरूवात करा. उत्तम पोषण आरोग्‍यदायी रोगप्रतिकारशक्‍तीसाठी महत्त्वाचे आहे. अनारोग्‍यकारक पोषण स्थिती आणि रोगप्रतिकारशक्‍तीबाबत केली जाणारी तडजोड चांगली नाही. आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याचा प्रयत्‍न करणारे प्रौढ व्‍यक्‍ती असोत किंवा मुलांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍याचा प्रयत्‍न करणारे पालक असोत दैनंदिन आहारामध्‍ये आवश्‍यक पौष्टिक घटकांचा समावेश असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. आरोग्‍यदायी रोगप्रतिकाशक्‍ती संपादित करण्‍यास मदत करण्‍यासाठी अ‍ॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन बिझनेसच्‍या मेडिकल अ‍ॅण्‍ड सायण्‍टिफिक अफेअर्सचे संचालक डॉ. गणेश काढे तुम्‍हाला आरोग्‍यदायी ठेवू शकणारे महत्त्वाचे पौष्टिक घटक आणि त्‍यांच्‍या स्रोतांबाबत सांगितले आहे.

 रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यास आवश्‍यक पदार्थ

> प्रथिन शरीरातील प्रत्येक पेशीसाठी मुलभूत बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करते, स्नायू, हाडे, हार्मोन्स आणि अ‍ॅण्‍टीबॉडीज सारख्या महत्वाच्या घटकांच्या विकासात योगदान देते. प्रथिने अ‍ॅण्‍टीबॉडीज निर्माण होण्‍यास साह्य करतात, तसेच रोगप्रतिकारक पेशींना वाढीसाठी आवश्यक अमिनो अॅसिड देत रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. अंडी हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, तसेच चणे, कॉटेज चीज, क्विनोआ, ग्रीक दही, शेंगदाणे आणि बदाम यांसारख्‍या खाद्यपदार्थांमधून देखील प्रथिने संपन्‍न प्रमाणात मिळतात.

> व्हिटॅमिन ए रोगप्रतिकारशक्तीचे नियमन करण्यास मदत करते. 'अ‍ॅण्‍टी-इन्फेक्टीव्ह व्हिटॅमिन' म्हणून ओळखला जाणारा हा पौष्टिक घटक त्वचा, तोंड, पोट आणि फुफ्फुस आरोग्‍यदायी ठेवतो, ज्‍यामुळे ते संसर्गाशी लढू शकतात. तीक्ष्ण दृष्टीसाठी देखील हा महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन ए संपन्‍न प्रमाणात मिळण्‍यासाठी काही फॅटसह त्याचे सेवन करा. रताळे, भोपळा, गाजर आणि पालक यांमध्‍ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते.

> व्हिटॅमिन सी शरीराला आरोग्‍यदायी त्वचा आणि संयोजी उती तयार करण्यास मदत करते, ज्‍या बाहेरील वातावरणामधील सूक्ष्‍मजंतूंना शरीरात प्रवेशास प्रतिबंधित करतात. व्हिटॅमिन सी पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणारे अ‍ॅण्‍टीऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते. पालेभाज्‍यांमधून अधिक लोह शोषून घेण्यास मदत करून ते अ‍ॅनिमियापासून संरक्षण करण्यास मदत करते. संत्र्यामध्‍ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. पण, याव्‍यतिरिक्‍त व्हिटॅमिन सीने युक्त असलेले काही पदार्थ म्हणजे किवी, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, टोमॅटो, फ्लॉवर आणि लाल मिरची.

> व्हिटॅमिन ई अ‍ॅण्‍टीऑक्सिडंट म्हणून कार्य करते, मुक्त रॅडिकल्समुळे पेशींच्या आवरणाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. आरोग्‍यदायी पेशी आवरण बाहेरील सूक्ष्‍मजंतूंपासून संरक्षण होण्‍यास मदत करतात, परिणामत: रोगप्रतिकारशक्‍ती आरोग्‍यदायी राहते. व्हिटॅमिन ई बहुतेक पदार्थांमध्ये आढळणारे सामान्य पौष्टिक घटक आहे. कूकिंग ऑईल्‍स, बियाणे आणि नट हा अपवादात्मकरित्या व्हिटॅमिन ई चा संपन्‍न स्रोत आहे.

> व्हिटॅमिन डी बहुआयामी पौष्टिक घटक आहे, जो रोगप्रतिकारक पेशी सक्रिय करण्यास आणि त्यांचे कार्य नियंत्रित करण्यास मदत करतो. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ करते. काही खाद्यपदार्थांमध्‍ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी३ आढळून येते, जसे फॅटी माशांचे मांस आणि फिश लिव्‍हर ऑईल्‍स, अंड्यातील पिवळा बलक, संत्र्याचा रस आणि चीज

> झिंक पेशींच्‍या पुनरुत्पादनासाठी आवश्यक आहे, जे नवीन रोगप्रतिकारक पेशींच्या संश्लेषणात महत्वाचे आहे. विशेषतः बालपण आणि किशोरवयीन काळात योग्य वाढ व विकासासाठी देखील झिंक आवश्‍यक आहे. मांसाहार आवडणाऱ्यांसाठी मांस, विशेषतः लाल मांस झिंकचा उत्कृष्ट स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी चणे, मसूर आणि सोयाबीन यांसारख्या अन्नामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. बिया देखील आपल्या आहारात आरोग्‍यदायी भर ठरू शकतात.

WhatsApp channel