Morning Habits for Healthy Body And Mind: निरोगी शरीर हा दीर्घआयुष्य जगण्याचा मंत्र आहे. निरोगी शरीर आणि मनासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही, फक्त काही सवयी तुम्हाला यात मदत करू शकतात. तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये अशा सवयी समाविष्ट कराव्यात ज्या तुमच्या जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलू शकतात. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी मॉर्निंग रुटीन कसे असावे जाणून घ्या.
जर तुम्हाला सकाळची सुरुवात शांततेने करायची असेल तर आदल्या रात्री काही तयार करून झोपा. जसे की आदल्या रात्री सकाळी घालायचे कपडे काढणे, सोबत घ्यायची बॅग तयार करणे, नाश्त्याची तयारी करणे इ. असे केल्याने तुम्ही सकाळची घाई गडबड टाळू शकता आणि दिवसाची सुरुवात शांत मनाने करू शकता.
बरेच लोक सकाळी उठल्यावर काही महत्त्वाची सकाळची कामे विसरतात. सकाळी उठल्यावर औषध घेणे किंवा पाणी पिणे विसरणे यासारखे काहीही असू शकते. जर तुमच्यासोबत असे वारंवार घडत असेल, तर आदल्या रात्री तुमचे सकाळची कामं लिहून ठेवा. जर तुम्हाला सर्व काही आठवत असेल, तर काही कोट्स लिहा जेणेकरुन तुम्ही ते सकाळी प्रथम वाचू शकाल. असे केल्याने तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स मिळेल.
अनेकांसाठी सकाळी उठणे कठीण असते. पण सकाळची निरोगी आणि शांत सुरुवात करण्यासाठी नेहमीपेक्षा दहा मिनिटे लवकर उठणे सुरू करा. तुम्ही हे करण्यासाठी अलार्म सेट करत असाल तर तो पुन्हा पुन्हा बंद करू नका. झोपेतून उठल्यानंतर बॉडी स्ट्रेच करा.
सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक हेल्दी पर्याय उपलब्ध आहेत. पण तरीही काही लोक सकाळची सुरुवात अनहेल्दी फूड खाऊन करतात. निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी नाश्त्यासाठी निरोगी पर्याय निवडा. असे केल्याने तुमचा मूड बऱ्याच प्रमाणात वाढतो. तसेच तुम्ही उत्साही राहाल.
तुमचे मन शांत करण्यासाठी तुम्ही ध्यानाचा अवलंब करू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत याचा समावेश करून तुम्ही सकारात्मक राहता आणि जीवनाचे निर्णय शांततेने घेता. काही वेळ घरात शांत ठिकाणी बसून ध्यान करा.
जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे शरीर फील गुड ब्रेन केमिकल्स रिलीज होते. हे तुम्हाला क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह बनविण्यात मदत करते. अशा परिस्थितीत सकाळी फिरायला किंवा जिमला जा. कोणताही व्यायाम करण्यासाठी २० ते ३० मिनिटे पुरेशी असतात. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही घरी योगासने करू शकता.
स्ट्रेचिंगमुळे शरीर आणि मन दोघांनाही फायदा होतो. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर बेसिक स्ट्रेचिंग करा. हे करण्यापूर्वी आपले वॉर्मअप रूटीन फॉलो करा.
तुम्ही नोकरी किंवा कामासाठी बाहेर जात असाल किंवा तुम्ही घरी असाल तरी संगीत तुमचा तणाव कमी करण्यास मदत करू शकते. तुमच्या काही आवडत्या गाण्यांची यादी बनवा आणि ती ऐका.
सकारात्मक राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा ज्यासाठी आपण कृतज्ञ आहात त्याबद्दल विचार करण्यासाठी सकाळी वेळ काढा. हे तुम्ही तुमच्या डायरीतही लिहू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या