मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: चाणक्याच्या या पद्धतींनी वाईट काळ लवकर संपेल, मिळेल यश!

Chanakya Niti: चाणक्याच्या या पद्धतींनी वाईट काळ लवकर संपेल, मिळेल यश!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 07, 2023 08:25 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti: चाणक्यांच्या धोरणांचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते. विद्वान असण्यासोबतच आचार्य चाणक्य हे एक महान शिक्षक देखील होते. चाणक्य नीती पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन, समाज आणि जीवनातील यशाशी संबंधित गोष्टींची माहिती देते. आचार्य चाणक्य यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतले होते. काही गोष्टींचा अंगीकार कोणत्याही व्यक्तीने आपल्या जीवनात केल्यास तो यशाची नवीन शिखरे गाठू शकतो. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी वाईट काळाबद्दल सांगताना म्हटले आहे की, कठीण काळात कोणत्याही व्यक्तीचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कठोर परिश्रम. काही काळ मेहनत करून त्यावर मात करता येईल.

यद् दूरं यद् दुराराध्यं यच्च दूरे व्यवस्थितम्।

तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम्।।

याचा अर्थ काय?

या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कठीण काळात कोणत्याही व्यक्तीचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्याची मेहनत असते, ज्याद्वारे तो आपला काळ बदलू शकतो. त्यामुळे अडचणीच्या काळात माणसाने हिंमत न हारता कठोर परिश्रम केले पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel