हिवाळा सुरु झाला आहे. पण तरी नुकताच महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडला. यामुळे अनेकांना सर्दी, खोकला आणि तपासारख्या आजारांचं सामना करावा लागत आहे. बदलेल्या वातावरणमुळे सर्दी होणायचं प्रमाण वाढलं आहे. सर्दी झाली की अनेकांनाच नाक ब्लॉक होत. यामुळे अनेकदा नीट श्वासही घेता येत नाही. ब्लॉक झालेलं नाक खूप त्रासदायक ठरते. तुम्ही फक्त मोकळा श्वासच घेऊ शकत नाही तर, वास आणि चवीचाही आनंद घेऊ शकत नाही. हिवाळ्यात नाक चोंदण्याची समस्या खूप सामान्य आहे. पण यावर घरगुती उपाय तुम्ही करू शकता. यासाठी स्वयंपाकघरात ठेवलेले काही मसाले उपयोगास येतील. हे मसाले त्यांच्या सुगंधी गुणधर्मांमुळे नाक उघडण्यास आणि आराम देण्यास मदत करतील. चला जाणून घेऊया या मसाल्यांबद्दल.
लसूण एक स्ट्रॉंग मसाला आहे. लसूण जेवणाची चव तर वाढवतोच पण याच सोबत तो त्याच्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांसाठी ओळखला जातो. त्यात सल्फर देखील असते जे श्वसनाचे आरोग्य राखते. याचमुळे जर तुमचं नाक ब्लॉक झालं असेल तर तुम्ही लसणाचा वास घ्यावा.
पुदिन्यात मेन्थॉल असते जे एक नैसर्गिक डिकंजेस्टेंट आहे. हे तुमच्या नाकातील अवरोधित वायुमार्ग उघडण्यास मदत करते. पुदिन्याच्या तेलाचा सुगंध देखील नाक बंद होण्यापासून आराम देऊ शकतो.
थंडीच्या दिवसात आल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे संयुग असते जे नाकाची जळजळ कमी करते आणि त्याचा तीव्र वास तुमचे ब्लॉक केलेले नाक साफ करू शकते. हिवाळ्यात नाक बंद झाल्यामुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी, गरम आल्याचा चहा पिण्याची शिफारस केली जाते.
ओवा केवळ तुमचे जेवण चवदार बनवत नाही तर नाकातील रक्तसंचय कमी करण्यासाठी देखील चांगले मानले जाते. काही दिवस ते खाण्यात किंवा सेलेरी चहा पिण्याने शक्यतो आराम मिळू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)