Gas in Stomack: हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात तयार होतो गॅस, अशा प्रकारे करा सुटका
Bloating Problem: काही पदार्थ हे आरोग्यदायी वाटत असले तरी ते खाल्ल्यानंतर गॅस, पोट फुगणे, ढेकर येणे आणि अपचन अशा समस्या उद्भवतात. अशा प्रकारचे हे गॅस तयार करणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
Foods That Cause Gas in Stomach: पोटात गॅस तयार होणे ही अनेकांना समस्या असते. त्यामुळे ढेकर येणे, पोट फुगणे आणि एअर पास होणे यासारख्या समस्या आपल्याला त्रास देतात. पोटाच्या या समस्या टाळण्यासाठी अनेक पद्धती सुचवल्या जातात. पण काही पदार्थांमुळे पोटात गॅस तयार होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे ढेकर येणे आणि ब्लॉटिंग होणे सुरू होते. त्यामुळे हे पदार्थ खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन पोटात गॅस बनणे टाळता येईल.
ट्रेंडिंग न्यूज
बीन्स
बीन्स हे प्लांट बेस्ड प्रोटीनचे समृद्ध स्त्रोत आहेत. पण पोटात गॅस तयार होण्यासही ते कारणीभूत आहे. बीन्समध्ये रॅफिनोज नावाची कॉम्प्लेक्स शुगर असते, जी सहज पचत नाही आणि पोटात गॅस तयार करते. म्हणून बीन्स रात्रभर भिजवून ठेवा आणि नंतर ते पूर्णपणे शिजवून खा. जेणेकरून अशा प्रकारची समस्या टाळता येईल.
दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थ प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. काही लोकांना दुधामुळे गॅसचा त्रास होतो तर दही हे देखील गॅसचे कारण आहे. याचे कारण म्हणजे लॅक्टेज पचण्यात अडचण येते, ज्यामुळे लॅक्टेज इनटोलरन्सच्या बाबतीत पोटात गॅसची तक्रार होते. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार होणाऱ्या गॅसमुळे या पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
गहू आणि ओट्स
गहू आणि ओट्स सारख्या धान्यांमध्ये देखील रॅफिनोज असते. ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. तांदूळ हे एकमेव धान्य आहे, ज्यामुळे पोटात गॅसचा त्रास होत नाही.
भाज्या
कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली यांसारख्या काही भाज्या पचायला सोप्या नसतात. आणि त्यात असलेल्या कॉम्प्लेक्स शुगरमुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होते. त्यामुळे या हेल्दी भाज्या खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
या पदार्थांमुळे देखील होते पोटात गॅसची समस्या
- सोडा ड्रिंक्स
- कँडी
- च्युइंगम
- प्रोसेस्ड फूड्स
- सफरचंद
- नाशपाती
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग