Habits Shows Social Media Addiction: निवांत वेळ घालवायचा असो किंवा कामाच्या मध्ये मध्ये शॉर्ट ब्रेक घ्यायचा असो लोक लगेच सोशल मीडियावर स्क्रोल करायला लागतात. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर रुटीनमध्ये केला जातो. अनेक वेळा त्याचे फायदेही पाहायला मिळतात. पण जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन फक्त सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी वापरत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण अनेक संशोधनातून समोर आले आहे की सोशल मीडियाचा अतिवापर तुम्हाला फक्त मानसिक आजारी करत नाहीये तर स्ट्रेस देखील वाढवत आहे. तसेच तो शारीरिकदृष्ट्याही अनहेल्दी करत आहे. तुम्हाला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे याबाबत या छोट्या गोष्टींवरून कळेल.
सोशल मीडिया स्क्रोल केल्यामुळे तुम्ही तुमचे दैनंदिन काम पुढे ढकलता. असे असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण सोशल मीडियाच्या व्यसनाला बळी पडण्याचे हे पहिले लक्षण आहे.
तुम्ही जेवत असाल किंवा मित्रांसह बाहेर फिरायला जात असाल तरीही तुम्ही सतत फोन वापरता. मित्रांशी बोलत असतानाही तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करत असाल तर ते तुमच्या व्यसनाचे लक्षण आहे.
आयुष्यात कोणतीही समस्या उद्भवली की, त्याचे निराकरण करण्यासाठी आपण सर्वप्रथम सोशल मीडियावर शोधायला लागतो. ही सवय असेल तर काळजी घ्या. याला सोशल मीडियाचे व्यसन म्हणतात.
जर तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा तुमचा आवडता सोशल मीडिया वापरता येत नसेल आणि तुम्हाला तुमच्या मनात अस्वस्थता जाणवत असेल, मूड खराब असेल तर तुमच्या सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेची ही लक्षणे आहेत.
जर तुम्ही तुमच्या मनात सतत सोशल मीडियाचा विचार करत असाल, तर तुम्ही सोशल मीडियाच्या व्यसनाला बळी पडल्याची ही लक्षणे आहेत. तुम्हाला वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)