Cholesterol Control Tips: शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार योग्य असणे गरजेचे आहे. हेल्दी राहण्यासाठी फिजिकल वर्कआउटसह आहार योग्य असणे गरजेचे आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा मोठा वाटा आपल्या लाइफस्टाइलमध्ये असतो. जर योग्य पदार्थ खाल्ले नाहीत तर त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खरंतर कोलेस्टेरॉल शरीरासाठी आवश्यक असते. पण ते जर जास्त प्रमाणात वाढले तर तेव्हा ते आपल्याला हानी पोहोचवू शकते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. असे काही पदार्थ आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवू शकता.
मेथीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि लिनोलेनिक अॅसिड असतात जे थेट खराब कोलेस्ट्रॉलवर हल्ला करतात आणि खूप प्रभावी आहेत.
ओट्स एक सुपरफूड आहे. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते, जे आपल्यासाठी फायदेशीर ठरते. ओट्स बायोफ्लेव्होनॉइड्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. याशिवाय हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात.
ग्रीन टीमध्ये हा एक हेल्दी चहा आहे. यांच्यातील असे घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या चहामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतेच त्याशिवाय हे वजन कमी करण्यास, मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करते.
आवळा हा बहुगुणी आहे. या फळामध्ये असलेले अमीनो अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सच्या मदतीने ते खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
कांदा हा भारतीय स्वयंपाक घरातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे. कांद्यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या