Useful Cooking Tips: अनेक वेळा घरच्या जेवणाला टेस्टी चव नसल्याची तक्रार अनेक लोक करतात. जर तुमच्या घरी सुद्धा तुमच्या स्वयंपाकाबद्दल तक्रार करत असतील किंवा हवे तसे तुमच्या स्वयंपाकाचे कौतुक होत नसेल तर तुम्ही काही सोप्या कुकिंग टिप्स लक्षात ठेवायला हव्या. या उपयुक्त कुकिंग टिप्स वापरून तुम्ही साधे अन्न देखील उत्तम प्रकारे चविष्ट होईल आणि लोक तुमच्या कुकिंग स्किलची प्रशंसा करतील. या कुकिंग टिप्स कोणत्या आहेत ते पाहा.
- सॅलडसाठी भाज्या धुतांना पाण्यात तुरटी मिसळून एकदा धुवा. हे भाज्यांमधून कीटकनाशके आणि जीवाणू काढून टाकेल.
- ग्रेव्हीसाठी कांदा भाजताना त्यात थोडेसे मीठ टाका. याने कांदा लवकर भाजला जातो शिवाय त्याचा रंगही छान येतो.
- पुरी बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर हे पीठ थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने पुरी तेल जास्त शोषणार नाही.
- बिर्याणीसाठी परफेक्ट ब्राउन कांदा हवा असेल तर कांदा तळताना त्यात थोडी साखर घाला.
- भजे, पकोडे बनवताना पिठात चिमूटभर आरारोट आणि गरम तेल घाला. यामुळे पकोडे छान क्रिस्पी होतात.
- रायता बनवताना दहीमध्ये थोडे हिंग आणि जिरा पावडर टाका. याने चव आणखी वाढते.
- कढीला नीट उकळी येईपर्यंत ते ढवळत राहावे. असे केल्याने कढी भांड्याच्या तळाशी चिकणार नाही.
- पराठे मऊ बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात उकडलेला बटाटा मॅश करून मिक्स करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)