मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: 'या' वाईट सवयींमुळे माणूस होतो गरीब!

Chanakya Niti: 'या' वाईट सवयींमुळे माणूस होतो गरीब!

Sep 17, 2023 08:37 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

चाणक्य नीती
चाणक्य नीती

Chanakya Niti: चाणक्य नीति हे आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले धोरण आहे. हे निती शास्त्र विविध विषयांवर केवळ सल्ला देत नाही तर योग्य मार्गदर्शनही करते. आचार्य चाणक्यांची नीती वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन प्रदान करते. या निती शास्त्रामध्ये अनेक महत्त्वाची तत्त्वे आणि धोरणे आहेत जी व्यक्तीला यशाची दिशा देतात. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब होत जाते. त्यामुळे या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत. चला जाणून घेऊया त्या वाईट सवयी कोणत्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

गोंधळात जगणारे लोक

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक घाणेरडे जीवन जगतात आणि स्वच्छ कपडे घालत नाहीत किंवा आपल्या आजूबाजूला घाणीचे वातावरण ठेवतात, असे लोक नेहमी गरिबीचे जीवन जगतात. त्यामुळे या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत

सूर्यास्तानंतर झोपणे

चाणक्य नुसार जे लोक संध्याकाळी सूर्यास्तानंतर झोपतात ते नेहमी गरीब राहतात. अशा वेळी झोपलेल्यांना माता लक्ष्मी कधीही आशीर्वाद देत नाही. त्यामुळे चुकूनही सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये.

अवाजवी खर्च

अवास्तव खर्च माणसाला गरीब बनवू शकतो. तुमच्या उत्पन्नानुसार तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवले तरच तुम्ही यशस्वी व्हाल. त्यामुळे तुमच्या खर्चाचे नियोजन करा, तुमच्या गरजा ओळखा आणि जपून खर्च करा.

कठोर बोलणारे लोक

चाणक्य म्हणतात की जे लोक कठोर किंवा कडवट बोलतात. माता लक्ष्मीही त्यांच्यावर कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कडू बोलण्याची सवय ताबडतोब सोडली पाहिजे आणि नेहमी गोड बोलले पाहिजे. कडवट बोलण्यामुळे माणसाचे नाते बिघडतेच शिवाय तो गरीबही होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel
विभाग