मराठी बातम्या  /  Lifestyle  /  These Bad Habits Can Damage Your Digestive System

Digestive System: या वाईट सवयी तुमची पचनसंस्था करू शकतात खराब!

Health Care
Health Care (Freepik)
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
May 26, 2023 07:49 AM IST

Digestive System Health Tips: तुमच्या काही सवयी तुमच्या पचनाशी संबंधित समस्या वाढवतात. जाणून घेऊयात या सवयींबद्दल...

रोज व्यायाम, योग्य आहार अशी निरोगी जीवनशैली जगल्यानंतरही काही लोकांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी समजत नाही की नक्की कुठे बिघडत आहे. आपली पोट बिघडलं किंवा साफ झालं नाही तर की संपूर्ण दिवस खराब जातो. तुमची पचनक्रिया तुमच्या काही सवयी बिघडू शकतात. अशा स्थितीत या सवयींचे भान ठेवणे गरजेचे आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या कोणत्या सवयी पचनक्रिया बिघडवू शकतात ते सांगणार आहोत. जाणून घ्या...

ट्रेंडिंग न्यूज

या सवयी बदला!

> जास्त खाण्याची सवय पचनसंस्था बिघडू शकते. अति खाण्याच्या सवयीमुळे पचनसंस्था तर बिघडतेच पण पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्याही वाढू शकतात.

> बर्‍याचदा लोक पटापट खातात यामुळेही पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अशा स्थितीत पचनाच्या समस्या टाळण्यासाठी सावकाश आणि आरामात खावे.

> जेव्हा एखादी व्यक्ती जास्त औषधे घेते तेव्हा देखील व्यक्तीला पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांना अशी सवय असते की जेव्हा त्यांना डोकेदुखी किंवा दुसऱ्या भागात दुखत असेल तेव्हा ते औषधे घेणे सुरू करतात. या सवयीमुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात

> काही लोक खाल्ल्यानंतर किंवा अन्नासोबत लगेच पाणी पितात, या सवयीमुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत व्यक्तीने जेवण करण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी सेवन करावे. यामुळे ते पोटाशी संबंधित समस्या टाळू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)