Dehydration Symptoms: तहान लागण्यासोबतच शरीरात दिसणारे हे लक्षणं आहेत डिहायड्रेशनचे संकेत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dehydration Symptoms: तहान लागण्यासोबतच शरीरात दिसणारे हे लक्षणं आहेत डिहायड्रेशनचे संकेत

Dehydration Symptoms: तहान लागण्यासोबतच शरीरात दिसणारे हे लक्षणं आहेत डिहायड्रेशनचे संकेत

Mar 30, 2024 05:36 PM IST

Summer Health Care Tips: अनेकदा लोक तहान लागल्यावर पाणी पितात. पण उन्हाळ्यात शरीरातील इतर लक्षणांवरही लक्ष ठेवणे गरजेचे असते, जे डिहायड्रेशनचा संकेत देतात. जाणून घ्या कोणती आहेत ती लक्षणे.

डिहायड्रेशनचे लक्षणे
डिहायड्रेशनचे लक्षणे (unsplash)

Symptoms of Dehydration: उन्हाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण किती असावे याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. इलेक्ट्रोलाइट संतुलन राखल्याने रक्ताचे पीएच सामान्य राहते. हे हृदयाचे ठोके आणि रक्तातील लिक्विड लेव्हल संतुलित करते आणि स्नायू, मज्जातंतू आणि हृदयाला संदेश पाठविण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात पाण्याचे खूप महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्याला कळते की शरीराला पाण्याची गरज आहे आणि शरीर डिहायड्रेट झाले आहे. पण तहान लागण्याव्यतिरिक्त ही लक्षणे दिसली तर समजून घ्या की शरीर डिहायड्रेट झाले आहे आणि शरीराला पुरेशा प्रमाणात हायड्रेशनची आवश्यकता आहे. डिहायड्रेशन दर्शविणारी लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.

मसल क्रॅम्प्स

पाण्याच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. परिणामी स्नायूंना संदेश मिळत नाही आणि वेदना सुरू होतात.

ड्रायलिप्स, तोंड कोरडे होणे

तोंडाभोवती आणि तोंडात कोरडेपणा जाणवणे. किंवा ओठ खूप कोरडे होतात. त्यामुळे तुमच्या आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवा. जेणेकरून शरीराच्या सामान्य कार्यात कोणताही अडथळा येणार नाही.

त्वचेचा कोरडेपणा

त्वचेमध्ये जास्त कोरडेपणा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे हे लक्षण आहे.

डोकेदुखी

इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे संदेशांना मज्जातंतूंच्या पेशींपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू लागते. डोकेदुखी झाल्यास लगेच पाणी किंवा लिक्विड प्यायल्यास वेदना कमी होऊ शकतात.

बद्धकोष्ठता

पाण्याच्या कमतरतेमुळे अन्न शोषण्यासही अडथळा येतो. त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते.

शरीरात जडपणा

संपूर्ण शरीरात जडपणा किंवा स्टिफनेस जाणवणे हे देखील डिहायड्रेशनचे लक्षण आहे.

यूरिन कलर

शरीरात पाण्याच्या कमतरतेचा अंदाज लघवीच्या रंगावरून लावता येतो. जर लघवीचा रंग पिवळा किंवा डार्क पिवळा असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे.

तहान

डिहायड्रेशनचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तहान लागणे.

कधी पाणी पिणे असते चांगले

चांगली शारीरिक हालचाल, जिम, व्यायाम करण्याच्या दोन तास आधी पुरेसे पाणी प्या. वेबएमडीच्या अहवालानुसार प्रत्येक २० मिनिटांच्या शारीरिक श्रमानंतर ४ ते ६ औंस पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच व्यायामानंतर पाणी नक्कीच प्यावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner