Travel News: होळीच्या सणाची चाहूल लागली आहे. फाल्गुन सुरू होताच होळीचा उत्साह लोकांना जाणवू लागतो. होळी (lifestyle news in Marathi) हा असा सण आहे ज्याची सगळेच वाट बघत असतात. हा सण रंग, आनंद सगळंच आयुष्यात घेऊन येतात. लहान ते मोठे सगळेच हा सण फार उत्साहात साजरा करतात. होळी हा सण फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय लेव्हलवरही साजरा केला जातो. तुम्हाला यंदा होळी हटके पद्धतीने साजरी करायची असेल तर तुम्ही काही ठिकाणाना भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला होळीचा सण साजरा करण्यासाठी भारतात कोणत्या जागा सर्वोत्तम आहेत याबद्दल सांगणार आहोत.
वृंदावनातील होळीची चर्चा जगभरात होते. अनेक दिवस इथे हा सण उत्सवात साजरा केला जातो. वृंदावनातील केंद्रस्थानी असलेले बांके बिहारी मंदिर हे उत्सवाचे केंद्रस्थान असते. फुलांच्या होळीपासून सुरू होणाऱ्या होळीपासून ते होळीच्या एक दिवस आधी रंगांची उधळण करून संपणारा हा जल्लोष आठवडाभर चालतो. कृष्णाला समर्पित असलेल्या या शहरात तुम्हाला लोक वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेले दिसतील.
दक्षिण भारतातील हम्पी फार प्रसिद्ध आहे. हे विजयनगर साम्राज्याचे घर होते. हम्पीला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. होलिका दहनासोबतच येथे रंगपंचमी देखील साजरी केली जाते. पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी हंपीला आवर्जून भेट द्या.
ब्रज, उत्तर प्रदेश येथे स्थित असलेलं मथुरा हे शहर भारतातील होळी साजरी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. याच कारणांमुळे होळीच्या काळात मथुरा हे लोकांसाठी स्वर्ग बनते. होळी साजरी करण्यासाठी देश-विदेशातून लोक येथे येतात.
बरसानाची लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. होळीच्या वेळी, बरसाना आणि नांदगाव येथील महिला पुरुषांना लाठीने हलकेसे मारतात. तर पुरुष ढालीने स्वतःचे संरक्षण करतात. मुख्य होळीच्या एक आठवडा आधी इथे लाठमार होळी साजरी केली जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)