Best Winter Honeymoon Destinations: नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी प्रत्येक कपल हनिमूनला जातात. हनिमूनला आजकाल बाहेरच्या देशात जाण्याचा जास्त ट्रेंड आहे. पण आपल्या भारतातही उत्तम जागा आहेत. तुमचं नुकतंच लग्न झालं असेल किंवा लग्न करणार असाल तर तुम्हीही हनिमूनला जायचं प्लांनिंग सुरु केलं असेल. हनिमून डेस्टिनेशन निवडण्यात प्रत्येक जोडप्याला वेगवेगळी पसंती असू शकते. काहींना समुद्रकिनारे आवडतात तर काहींना बर्फवृष्टी पाहायला बाहेर पडतात.काही लोकांना हिरवेगार पर्वत आकर्षित करतात तर काहींना ऐतिहासिक ठिकाणे पाहणे आवडते. पण एकंदरीतच हिवाळ्यात प्रवास करण्याची मजा वेगळीच असते. असेच काही सुंदर हनिमून डेस्टिनेशन एक्सप्लोर करूयात.
जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांततेत क्षण घालवायचे असतील तर उटी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे दक्षिणेकडील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. उटीच्या हवामानातच रोमांस आहे. या रोमँटिक हवामान तुमचे प्रेम आणखी वाढवेल. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत तामिळनाडूमध्ये वसलेले उटी येथे जाण्यासाठी उत्तम आहे.
वायनाड हे दक्षिणेकडील अजून एक डेस्टिनेशन आहे. केरळमधील वायनाड हे हनिमूनसाठीही उत्तम ठिकाण आहे. ऑक्टोबर ते मार्च हे महिने वायनाडला भेट देण्यासाठी उत्तम ठरतात. वायनाडमध्ये तुम्ही निसर्गाला जवळून बघू शकता आणि मसाल्याच्या बागांना भेट देऊ शकता. ट्रेकिंग आणि अनेक उपक्रमही इथे होतात.
डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील एक सुंदर शहर आहे. जिथे तुम्ही तुमच्या हनिमूनसाठी जाऊ शकता. उंच बर्फाच्छादित देवदार वृक्ष आणि चहाच्या बागांमधून येणारा सुगंध तुमची ट्रिप सुंदर करेल. डलहौसीला भेट देण्याचा सर्वोत्तम हंगाम म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. ३-४ दिवसांच्या सहलीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. डलहौसीमध्ये तुम्ही स्टार व्हिलेज फन अँड फूड कॅफे, कलाटॉप खज्जियार अभयारण्य, सेंट फ्रान्सिस चर्च, सेंट जॉन चर्च यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पृथ्वीवर स्वर्ग म्हणजे जम्मू काश्मीर. हनिमूनसाठी हे एक उत्तम डेस्टिनेशन आहे. थंडीत तुम्ही हिमवर्षावाचा आनंदही घेऊ शकता. येथे तुम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट, स्कीइंगचा आनंद घेऊ शकता. अल्ची मठ, स्पिटुक मठ, रघुनाथ मंदिर, हजरतबल तीर्थ, दल सरोवर भेट देण्यास उत्तम ठिकाण आहेत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या