मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हे आहेत जगातील सर्वात हेल्दी फूड्स, दीर्घायुष्यासाठी खा, खिशालाही पडणार नाही भारी

हे आहेत जगातील सर्वात हेल्दी फूड्स, दीर्घायुष्यासाठी खा, खिशालाही पडणार नाही भारी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 05, 2022 05:55 PM IST

Healthy Food List: जगातील प्रत्येकाला निरोगी राहायचे आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निसर्गाने आपल्याला अनेक आरोग्यदायी गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत. ते रोज खाल्ल्याने तुम्ही जास्त काळ जगू शकता.

हेल्दी फूड लिस्ट
हेल्दी फूड लिस्ट

Healthiest Foods to Prevent Cancer and Heart Disease : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी लहानपणापासूनच खाण्याच्या योग्य सवयी ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही आत्तापर्यंत लक्ष दिले नसले तरीही अजून उशीर झालेला नाही. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांची नावे सांगत आहोत जे जगातील सर्वात आरोग्यदायी मानले जातात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते फार महाग नाही आणि तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल. यापैकी जास्तीत जास्त गोष्टींचा आहारात समावेश करा.

लिंबू

लिंबू बहुतेक भारतीय स्वयंपाक घरामध्ये सहज आढळते. बहुतेक लोक पदार्थांमध्ये आंबटपणा किंवा चव घालण्यासाठी याचा वापर करतात. त्यात इतके औषधी गुणधर्म आहेत की ते जगातील सर्वात आरोग्यदायी फळांमध्ये गणले जाते. लिंबू व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत. असे मानले जाते की ते कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते. अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या या फळाचा आहारात समावेश करा.

डाळी

कडधान्ये हा भारतीय घरातील दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पौष्टिकतेमुळे परदेशी स्वयंपाकघरातही डाळींनी आपले स्थान निर्माण केले आहे. डाळींमध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. विविध प्रकारच्या कडधान्ये खाऊन जास्तीत जास्त पोषण मिळू शकते.

लसूण

लसणाच्या वासामुळे अनेक लोकांना लसूण आवडत नाही. परंतु ते त्याचे पौष्टिक मूल्य नाकारू शकत नाहीत. लसूण बॅक्टेरिया मारतो, कोलेस्ट्रॉल कमी करतो, रक्तदाब राखतो आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतो. तुम्ही लसूण भाजीत, सूपमध्ये, लोणचे म्हणून किंवा कच्चेही खाऊ शकता. लसणात कर्करोग विरोधी गुणधर्म देखील असल्याचे मानले जाते.

पालक

पालक ही पोषक तत्वांनी युक्त अशी भाजी आहे. त्यात जीवनसत्त्वे ए, के आणि आवश्यक फोलेट असतात. पालकाला सुपरफूड असेही म्हणतात. त्यात झेक्सॅन्थिन आणि कॅरोटीनोइड्स असतात. हे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकते. त्यामुळे पालक हे कॅन्सरविरोधी अन्न म्हणूनही गणले जाते. पालक डोळ्यांसाठी चांगले आहे, रक्तातील साखर कमी करते आणि उच्च रक्तदाब देखील दूर करते.

बीटरूट

चवीच्या बाबतीतही बीटरूट बहुतेक लोकांना आवडत नाही. तरी त्याच्या औषधी गुणधर्मां समोर त्याची चव इग्नोर केली जाऊ शकते. बीटरूट रक्तदाब कमी करते, मेंदूसाठी चांगले असते, त्यात फोलेट, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम सारखे सूक्ष्म पोषक घटक असतात.

अक्रोड

अक्रोड हे ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. कर्करोगासारख्या मोठ्या आजारापासून बचाव करण्यासाठी शरीरात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असणे आवश्यक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. अक्रोड हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जाते. कारण त्यात निरोगी चरबी असते. तथापि, ते देखील मर्यादित प्रमाणात खावे.

डार्क चॉकलेट

अक्रोड प्रमाणेच डार्क चॉकलेट देखील थोडा महाग पर्याय आहे. जर तुम्ही खाऊ शकत असाल तर त्याचाही रुटीनमध्ये समावेश करा. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याचे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तसेच मूडही चांगला राहतो. पण तेही मर्यादित प्रमाणात खावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या