मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Traveling in January: जानेवारीमध्ये भारतात भेट देण्यासाठी ही ठिकाणं आहेत सर्वोत्तम!

Traveling in January: जानेवारीमध्ये भारतात भेट देण्यासाठी ही ठिकाणं आहेत सर्वोत्तम!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 03, 2024 03:33 PM IST

Long Weekend Traveling Tips: या महिन्यात २६ ते २८ जानेवारीचा लाँग वीकेंड येत आहे. या विकेंडला या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

Traveling Tips
Traveling Tips (Pixabay)

Weekend येत्या जानेवारीच्या लाँग वीकेंडमध्ये तुम्ही कुठे फिरायला जायचं प्लॅन करत असाल तर कोणत्या ठिकाणी भेटायला जायचं ते जाणून घ्या. या महिन्यात २६ ते २८ जानेवारीचा लाँग वीकेंड येत आहे. वास्तविक, २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन शुक्रवारी येत आहे आणि शेवटचा शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने भेट देण्याची ही उत्तम संधी आहे. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांच्या सहलीसाठी तुम्ही भारतातील काही भाग एक्सप्लोर करू शकता किंवा छोट्या ट्रिपला जाऊ शकता. पण प्रश्न पडतो की जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडीत कुठे जायचं. यासाठीच आम्ही यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊयात कुठे फिरायला जात येईल ते.

जयपूरला भेट द्या

ऐतिहासिक किल्ला, राजस्थानी संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ पिंक सिटीला राजस्थानमधील सर्वोत्तम पर्यटन शहर बनवतात. मुंबई द्रुतगती मार्गावरून तुम्ही काही तासांत जयपूरला पोहोचाल. जानेवारीत या गरम ठिकाणी नक्की भेट द्या.

रणथंबोर राष्ट्रीय उद्यान

तुम्ही राजस्थानमधील रणथंबोरला छोट्या सहलीसाठी भेट देऊ शकतात. हिवाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर बनते. येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पण तुम्ही गुलाबी थंडीत जानेवारीत रणथंबोरला कुटुंबासोबत भेट देण्याची वेगळीच मज्जा आहे.

अल्मोडा, उत्तराखंड

उत्तराखंड हा हिल स्टेशनचा बालेकिल्ला आहे आणि तुम्ही जानेवारीमध्ये अल्मोडाला भेट देऊ शकता. हिरवळ आणि ढगांनी आच्छादलेले पर्वत असे निसर्गसौंदर्य पाहून मंत्रमुग्ध व्हाल.येथे तुम्ही जोरी पॉइंट, जागेश्वर मंदिर, सूर्य मंदिर, बिनसार अशी सुंदर ठिकाणे पाहू शकता. अल्मोडामध्ये अनेक बाजारपेठा आहेत जिथे तुम्ही स्थानिक कपडे आणि इतर अनेक स्थानिक गोष्टी खरेदी करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel