मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel: हनिमूनसाठी भारतातील ही ठिकाणे आहेत सर्वोत्तम!

Travel: हनिमूनसाठी भारतातील ही ठिकाणे आहेत सर्वोत्तम!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 12, 2023 03:48 PM IST

Honeymoon Destination: कोणत्याही कपलसाठी हनिमून खूप खास असते. भारतातच अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हनिमूनला जाऊ शकता.

Honeymoon Trip
Honeymoon Trip (freepik)

est places in India for honeymoon: लग्नानंतर कपल्सची ऑफिशल ट्रिप म्हणजे हनिमून. ही ट्रिप जोडप्यासाठी खूप खास असते. आजकाल हनिमूनसाठी परदेशात जाण्याची क्रेझ खूप वाढली आहे, पण ही ठिकाणे बजेटमध्ये बसत नाहीत. अशावेळी तुम्ही भारतातील बेस्ट ठिकाणं तुमच्या हनिमूनसाठी निवडू शकतात. भारतातील अशी अनेक ठिकाणे आहेत जी हनिमून डेस्टिनेशनसाठी सर्वोत्तम आहेत आणि बजेटमधेही आहेत. हनिमूनसाठी या ठिकाणी जाणे तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी एक सुंदर अनुभव ठरेल.

ट्रेंडिंग न्यूज

या ठिकाणांना द्या भेट

माउंट अबू

माउंट अबू हे नाव ऐकताच परदेशातील ठिकाण वाटतं. पण हे ठिकाण राजस्थानमधील आहे. या ठिकाणाचं सौंदर्य मन प्रसन्न करते. कपल्ससाठी हे ठिकाण रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. आजूबाजूची हिरवाई आणि डोंगर आणि तलावांची सुंदर दृश्ये तुमचा हनीमून अजून छान बनवतील. आपल्या जोडीदाराचा हात धरून सूर्यास्ताच्या वेळी ढगांच्या बदलत्या रंगछटा पाहणे हा एक वेगळाच आनंद असतो.

गोवा

गोवा हे सगळ्याचं आवडतं डेस्टिनेशन आहे. तरुणाई ते मोठे सगळ्यांना हे ठिकाण आवडत. इथे गेल्यावर परदेशातल्यासारखे वाटेल. हे जोडप्यांचे आवडते सुट्टीचे ठिकाण आहे. बीचवर आपल्या जोडीदारासोबत सुंदर सूर्यास्त पाहणे एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा कमी नसेल. यासोबतच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करू शकता.

केरळ

जर तुम्ही लग्नानंतर हनिमूनचा प्लॅन करत असाल तर तुमच्या सर्वोत्तम डेस्टिनेशन यादीत केरळचा समावेश करा. तुमच्या लाइफ पार्टनरसोबत इथे घालवलेला प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यासाठी अविस्मरणीय असेल. नैसर्गिक दृष्यांसोबतच, केरळमध्ये वैदिक स्पा, ट्री हाऊस अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचा हनिमून प्रवास खास बनतो.

जम्मू आणि काश्मीर

बर्फाच्छादित पर्वत, हिरवेगार सुंदर दऱ्या, सुंदर तलाव, या सर्व प्रेक्षणीय स्थळांमध्ये जोडीदारासोबत वेळ घालवणे कुणासाठीही स्वर्गापेक्षा कमी नसेल. होय, आपण भारताचे नंदनवन म्हटल्या जाणार्‍या जम्मू-काश्मीरबद्दल बोलत आहोत. जर तुम्ही हनिमूनचा प्लान करत असाल तर तुम्ही इथे येऊन दल लेक, गुलमर्ग, पहलगाम सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)

 

 

WhatsApp channel