Periods Tips: पीरियड्समध्ये आहारात घ्या या ५ गोष्टी, वेदना आणि ब्लोटिंगपासून मिळेल मुक्ती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Periods Tips: पीरियड्समध्ये आहारात घ्या या ५ गोष्टी, वेदना आणि ब्लोटिंगपासून मिळेल मुक्ती

Periods Tips: पीरियड्समध्ये आहारात घ्या या ५ गोष्टी, वेदना आणि ब्लोटिंगपासून मिळेल मुक्ती

Published Jun 26, 2023 04:26 PM IST

Menstrual Cycle: तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही ही पीरियड क्रॅम्प्स कमी करू शकता. याबाबत आहारतज्ज्ञ काय सांगतात ते पाहा.

पीरियड क्रॅम्पपासून आराम मिळवण्यासाठी आहारातील बेस्ट गोष्टी
पीरियड क्रॅम्पपासून आराम मिळवण्यासाठी आहारातील बेस्ट गोष्टी (unsplash)

Best Food to Eat During Menstruation: मासिक पाळीच्या काळात महिलांना पोटदुखी, क्रॅम्प्स, चिडचिड, मायग्रेन, पाठदुखी अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सरासरी एक स्त्री तिच्या आयुष्यातील ७ वर्षे मासिक पाळीत घालवते. या काळात अनेक महिला पोटातील असह्य दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी औषधे घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही ही वेदना आणि क्रम्प्स कमी करू शकता. आहारतज्ज्ञ राधिका गोयलने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

आले

एका संशोधनानुसार मासिक पाळी दरम्यान दररोज आले घातलेले कोमट पाणी प्यायल्याने वेदना, सूज आणि क्रॅम्प यापासून आराम मिळतो.

अननस

अननसमध्ये ब्रोमेलेन एंझाइम असते, जे मासिक पाळीच्या दरम्यान ब्लोटिंग आणि ओटीपोटात क्रॅम्पच्या समस्यांशी लढा देऊन आराम करण्यास मदत करते.

लिंबू

मासिक पाळीच्या काळात अनेक वेळा जास्त रक्तस्त्राव होत असल्याने महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता होते. या प्रकरणात लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड अन्नातून लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे लोहाची कमतरता कमी होण्यास मदत होते. या काळात लिंबाचे सेवन केल्याने चिडचिडेपणा आणि मूड स्विंग यांसारख्या समस्याही टाळता येतात.

टरबूज

टरबूजमध्ये लाइकोपीन नावाचे वनस्पती संयुग असते, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. या काळात टरबूज खाल्ल्याने हात-पायांची सूज कमी होते.

 

बीटरूट

मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यास स्त्रीच्या शरीरात अशक्तपणा येतो. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता होते आणि शरीर सुस्त होते. अशा स्थितीत बीटरूटचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता तर दूर होतेच पण शरीरातील उर्जा पातळी राखण्यासही मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner