मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: या कार्यांमुळे पती-पत्नीमधील संबंध होतात कमकुवत, जाणून घ्या चाणक्य नीती!

Chanakya Niti: या कार्यांमुळे पती-पत्नीमधील संबंध होतात कमकुवत, जाणून घ्या चाणक्य नीती!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 13, 2024 08:25 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti for husband wife: जगातील महान मुत्सद्दी, राजकारणी आणि मार्गदर्शक म्हून ओळख असणारे आचार्य चाणक्य कोणाला माहित नाहीत. त्यांनी चाणक्य नीती लिहली. त्यांनी त्यात वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाची सूत्रे (relationship tips) सांगितली आहेत. चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या या गोष्टी आजही पूर्णपणे प्रासंगिक आहेत. यानुसार पती-पत्नीच्या नात्यात छोटीशी दरी आली तरी ती भरून काढणे कठीण होऊन बसते. त्यामुळे पती-पत्नीने हे नाते जपून ठेवावे.तसेच त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा, वैवाहिक जीवन रुळावरून घसरायला किंवा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. चला जाणून घेऊयात या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल...

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

> संशय घेणे: पती-पत्नीने एकमेकांवर कधीही संशय घेऊ नये. ही गोष्ट नात्यात दुरावा आणू शकते. यासोबतच एकमेकांपासून काहीही लपवू नये. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नकळत शंका घेण्याऐवजी एकमेकांशी बोलून तो प्रश्न सोडवा. पती-पत्नीमध्ये विश्वास असणे खूप गरजेचे आहे. तरच त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते आणि आनंदीही राहते.

Chanakya Niti: या ४ गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला होईल पश्चात्ताप!

> तुमच्या गोष्टी इतरांना सांगू नका: पती-पत्नीने एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टी कधीही कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नयेत. असे केल्याने ते इतरांसमोर हसण्याचे पात्र बनतात आणि त्यांचे परस्पर संबंधही कमकुवत होतात.

Chanakya Niti: शिक्षणाशिवाय मानवी जीवन आहे व्यर्थ, चाणक्यांकडून जाणून घ्या महत्त्व!

> अपमान: पती-पत्नीने कधीही एकमेकांचा अपमान करू नये. फक्त पर्सनलीच नाही तर इतरांसमोरही कधीही अपमानास्पद बोलू नये. असे केल्याने पती-पत्नीच्या मनातील एकमेकांबद्दल आदराची भावना कमी होते. तर भक्कम वैवाहिक जीवनासाठी प्रेमासोबतच आदरही आवश्यक असतो कारण पती-पत्नीच्या नात्यात आदर नसल्यामुळे नाते कमकुवत होते.

Chanakya Niti: आयुष्यात सगळ्याच बाबतीत फसवणूक होतेय? चाणक्यांचे हे शब्द करतील मदत!

>सहकार्याचा अभाव: पती-पत्नी ही रथाची दोन चाके आहेत असं म्हंटल जातं. त्यांच्या परस्पर सहकार्यानेच कुटुंब आणि जीवन चालते. यामध्ये एकाही व्यक्तीचे योगदान कमी लेखता येणार नाही. त्यामुळे पती-पत्नी दोघांनीही आपापली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडणे गरजेचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel