Symptoms of Heart Attack: आजकाल लोकांना लहान वयातही अनेक मोठे आजार होतात. अनेकांना लहान वयात हृदयाचे विकार होतात. अनेकजण या आजारांनी ग्रासलेले आहेत. हृदयविकाराचा झटका हा एक जीवघेणा आजार आहे. या घातक आजारांपासून दूर राहण्यासाठी नेहमी आरोग्यदायी गोष्टी खाव्यात. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात अनेक लक्षणे दिसतात, ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. असं न करता या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात ही कोणती लक्षणं आहेत ते...
तुमच्या पायात दररोज सूज येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये तुम्हाला अनेक लक्षणे दिसतात. तुम्हाला श्वासोच्छवासाची लक्षणे आधीच दिसू शकतात. श्वास घेण्यास त्रास होणे ही एक समस्या दिसू लागतात.
जर तुम्हाला पुन्हा पुन्हा चक्कर येत असेल तर समजावे की काही रोगाचा धोका आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही मिनिटे किंवा महिने आधी तुम्हाला ही समस्या येत राहते.
हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तुम्हाला कानाशी संबंधित समस्याही असतात. तुम्हाला कानात खूप जडपणा जाणवू लागला तर त्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये.
हृदयविकाराचा झटका वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, परंतु ते येण्यापूर्वी ते शरीराला अनेक संकेत देतात. जर तुम्हाला तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये काही काळ बदल जाणवत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)