Homemade deodorant to get rid of underarm odor: पावसाळ्यात घाम आणि अंडरआर्म्सची दुर्गंधी खूप त्रासदायक होते. ही दुर्गंधी सहसा स्वच्छतेच्या अभावामुळे किंवा कमी पाणी पिण्यामुळे होते. खरं तर, जेव्हा जीवाणू घामाच्या संपर्कात येतात तेव्हा ते दुर्गंधी सोडतात. यामुळे सभोवतालच्या लोकांना त्रास होतो. याशिवाय कांदा, लसूण जास्त खाल्याने आणि हार्मोनल चेंजसमुळे अंडरआर्म्समधून दुर्गंधी येते. त्यामुळे एखाद्याला लाजही वाटते.जर तुम्ही देखील शरीराच्या दुर्गंधीने त्रस्त असाल आणि यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर, काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करता येईल. या गोष्टींचा तुमच्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पाहूया कोणत्या नैसर्गिक गोष्टी डिओडोरेंट्स म्हणून वापरता येतात.
बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ते अंडरआर्म्सवर लावा. आणि 10-15 मिनिटांनी धुवून टाका. यामुळे घामाचा वास कमी होतो आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.
नारळाच्या तेलामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे आंघोळीनंतर नारळाचे तेल अंडरआर्म्समध्ये लावा. यामुळे दुर्गंधी कमी होते आणि त्वचेला मॉइश्चरायझेशन देखील होते.
ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. आंघोळीनंतर अंडरआर्म्सवर स्प्रे करा. हे त्वचेचे पीएच संतुलित करते आणि दुर्गंधी दूर करते.
लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. याच्या मदतीने घामाचा वास दूर होऊ शकतो. यासाठी कपड्यावर थोडा लिंबाचा रस अंडरआर्म्सवर लावून थोड्या वेळाने पुसून टाका.यामुळे घामाचा वास निघून जाईल.
एलोवेरा जेलमध्ये देखील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहेत जे त्वचेतून दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया सहजपणे काढून टाकू शकतात. आंघोळीनंतर ते थेट अंडरआर्म्सवर लावा. ते त्वचेला थंड करते ज्यामुळे दुर्गंधीचा प्रभाव कमी होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)