Yoga Asanas For Morning Sickness In Pregnancy: गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत मॉर्निंग सिकनेस खूप सामान्य आहे. मॉर्निंग सिकनेसमध्ये मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि खाण्यापिण्याची चव आणि वास नकोसे वाटणे यांचा समावेश होतो. साधारणपणे मॉर्निंग सिकनेसची समस्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीपासूनच संपते. मात्र काही महिलांना संपूर्ण नऊ महिने या त्रासातून जावे लागते. त्यामुळे सामान्य जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात होणाऱ्या मॉर्निंग सीकनेसपासून हे योगासन आराम देऊ शकतात.
हे योगासन केल्याने मन शांत होते आणि शरीर उत्साही होते. हार्ट पोझ करण्यासाठी गुडघ्यावर बसा आणि पुढे वाका. डोके जमिनीवर ठेवा आणि दोन्ही हात पुढे पसरवा आणि तळवे जमिनीवर ठेवा. ४-५ दीर्घश्वास घ्या आणि या स्थितीत रहा. आता प्रथम हात वर करा आणि हळूहळू मुळ स्थितीत या.
गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून ही योगासने करण्यासाठी तज्ञ किंवा उशीची मदत घ्या. चाइल्ड पोझ केल्याने मनाला आराम मिळतो आणि मॉर्निंग सिकनेसच्या समस्येपासून आराम मिळतो. हे करण्यासाठी गुडघ्यावर बसा, परंतु पाय मांड्यापासून हिपला समांतर पसरवा. आता डोके उशीकडे ठेवून त्यावर टेकवा. रिलॅक्स करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक ते दोन मिनिटे या स्थितीत राहिल्यानंतर परत सामान्य स्थितीत या.
हे योगासन केल्याने छाती मोकळी होण्यास आणि मानेला आराम मिळण्यास मदत होते. ही पोझ करण्यासाठी जमिनीवर बसून पाय गुडघ्यातून वाकवा आणि दोन्ही पायांची बोटे जोडा. आता पाठ मागच्या बाजूला वाकवा, आधारासाठी कंबरेला उशी ठेवा. दीर्घश्वास घेऊन काही मिनिटे असेच पडून राहा. हा व्यायाम पेल्विक फ्लोर स्नायूंना आराम देतो.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत मन आणि शरीराला आराम देण्यासाठी वॉल पोझ हे आरामदायी व्यायाम आहे. जमिनीवर झोपा आणि आपले पाय भिंतीवर ठेवा. हा व्यायाम लोअर बॅक पेन आणि पायांच्या थकलेल्या स्नायूंना रिलॅक्स करण्यास मदत करतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या