मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dark circles: 'या' ४ गोष्टींमुळे कमी होतील डार्क सर्कल्स! नक्की ट्राय करा

Dark circles: 'या' ४ गोष्टींमुळे कमी होतील डार्क सर्कल्स! नक्की ट्राय करा

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 25, 2023 11:58 AM IST

Skin Care: जर तुम्हीही डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती गोष्टींचाही वापर करू शकता.

स्किन केअर
स्किन केअर (Freepik )

Dark Circles Home Remedies: अनेक लोक डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असतात. दीर्घकाळ स्क्रीन पाहणे, तणाव, झोप न लागणे आणि इतर अनेक कारणांमुळे या समस्येला सामोरे जावे लागते. प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर असावी असं वाटतं. अनेकजण आपला चेहरा सुंदर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती वापरतात. पण सध्याच्या जीवनशैलीत त्वचेची काळजी घेणे कठीण झाले आहे. दुसरीकडे, दिवसभर काम केल्यामुळे किंवा झोप न लागल्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्यासारखी समस्या उद्भवते. अ शा स्थितीत तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून पाहू शकता.

काकडी

काकडीचे तुकडे करा. त्यांना थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे काप डोळ्यांवर ठेवा. किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते काढून टाका.

गुलाब पाणी

गुलाबपाणी टोनर म्हणून सर्रास वापरले जाते. एक कापसाचा गोळा गुलाब पाण्यात भिजवून प्रभावित भागावर लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते काढून टाका.

कोल्ड टी बॅग्ज

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये ३० मिनिटे ठेवा. यानंतर बॅग डोळ्यांवर ठेवा. १० ते १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते काढून टाका.

थंड दूध

दूध हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्रोत आहे. दुधात कापसाचे पॅड भिजवा. तुमच्या काळ्या वर्तुळांवर पॅड लावा. ते किमान १० मिनिटे राहू द्या आणि नंतर काढून टाका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग