Joint pain: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या ४ गोष्टींमुळे सांधेदुखी होईल कमी, जाणून घ्या सविस्तर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joint pain: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या ४ गोष्टींमुळे सांधेदुखी होईल कमी, जाणून घ्या सविस्तर!

Joint pain: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या ४ गोष्टींमुळे सांधेदुखी होईल कमी, जाणून घ्या सविस्तर!

Feb 12, 2024 10:19 PM IST

Home Remedies: आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात ठेवलेल्या ४ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सांधेदुखीपासून आराम मिळवू शकता.

how Get rid of joint pain in winter
how Get rid of joint pain in winter (freepik)

Home remedies for body pain: हिवाळ्यात अनेक आजार जडतात. सर्दी, ताप, खोकला अशा कॉमन आजरसोबत एक आजार होतो तो म्हणजे संधिवात. यामधे हाडं दुखतात. काही लोकांना तीव्र सांधेदुखीचा त्रास होत राहतो. यापासून आराम मिळण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे घेतात. पण आयुर्वेदाकडे लक्ष दिल्यास कमी पैशात यापासून सुटका मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात ठेवलेल्या ४ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सांधेदुखीपासून आराम मिळवू शकता.

हे उपाय फॉलो करा

> शरीरातील सांधेदुखी दूर करण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे.यात कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हे सर्व पोषक घटक सांधे मजबूत करण्यास मदत करतात.

> तुळस सगळ्यांच्या घरीच असते. या तुळशीच्या वापरामुळे सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे वेदनापासून आराम देतात. तुम्ही रोज सकाळी तुळशीची पाने चावू शकता.

> मोहरीच्या तेलात कापूर मिसळून गुडघ्यांना मसाज केल्यास सांधेदुखीपासून होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल. यामुळे हात-पायांची सूजही कमी होते.

> याचबरोबर सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. छातीला मालिश करावी लागेल. यामुळे छातीत जळजळ होण्यापासूनही आराम मिळेल.

> हे रक्ताभिसरण सुधारते. हे तेल दृष्टी सुधारण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. रोज झोपण्यापूर्वी तळवे मसाज करावे लागतात. यामुळे कमकुवत डोळ्यांची दृष्टी सुधारते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner