मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Tourism Day: भारतातील या ४ ठिकाणांना परदेशी पाहुण्यांची आहे पसंती, तुम्हीही आवर्जून द्या भेट!

National Tourism Day: भारतातील या ४ ठिकाणांना परदेशी पाहुण्यांची आहे पसंती, तुम्हीही आवर्जून द्या भेट!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 24, 2024 04:32 PM IST

Travel and Tourisum: दरवर्षी २५ जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे परदेशी लोक खूप पसंत करतात.

National Tourism Day 2024
National Tourism Day 2024 (freepik)

National Tourism Day: राष्ट्रीय पर्यटन दिन दरवर्षी २५ जानेवारी रोजी भारतात साजरा केला जातो. या दिवसमागचा मुख्य उद्देश आहे देशातील पर्यटनाला चालना देणे. एवढेच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटन फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला हे माहित आहे का की देशाच्या एकूण जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा ९.२ टक्के आणि रोजगारामध्ये ८.१ टक्के आहे. पर्यटनाच्या बाबतीत भारत हा श्रीमंत देश मानला जातो. काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, पर्वतांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत भारतात अनेक ठिकाणे आहेत. भारतात असे अनेक ठिकाणं आहेत जिथे परदेशातून पर्यटक जास्त प्रमाणात येतात. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे परदेशी लोकांची गर्दी असते.

राजस्थान

पर्यटनाच्या बाबतीत राजस्थान नंबर वन आहे. ठिकाण कला आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. माहितीनुसार फ्रान्स आणि ब्रिटनमधील सर्वाधिक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. इथे तुम्ही जयपूर, जोधपूर, जैसलमेर, माउंट अबू आणि उदयपूरला भेट देऊ शकता.

Travel: हे सुंदर ठिकाण पर्वतांची राणी म्हणून जाते ओळखले, आवर्जून द्या भेट!

काश्मीर

पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर. भारतीय पर्यटनातील हे महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे अनेक व्हीआयपी परदेशी पाहुणे येथे भेट देण्यासाठी आले आहेत. काश्मीरमध्ये तुम्ही गुलमर्ग, दल सरोवर, परी महल, पहलगाम आणि नागिन तलावाला भेट देऊ शकता.

Long Weekend Travel: या महिन्याच्या लॉंग विकेंडला करा महाराष्ट्रातील या बीचला भेट देण्याचा प्लॅन!

आग्रा

विदेशी पाहूणांच्या पर्यटन यादीत आग्रा पहिल्या क्रमांकावर आहे. हे ठिकाण ऐतिहासिक ठिकाण आहे. इथेच सुंदर ताजमहाल आहे, जिथे केवळ स्थानिक लोकच नाही तर परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी असते. भारतातील सर्वाधिक व्हीआयपी पर्यटन स्थळांमध्ये याचा समावेश होतो. ताजमहाल वेबसाइटनुसार, दरवर्षी ७ ते ८ दशलक्ष पर्यटक भेट देतात.

Republic Day 2024: लहान मुले असो मोठे, प्रत्येकाने दिल्लीतील आवर्जून बघावी ही ऐतिहासिक ठिकाणे!

दिल्ली

देशाची राजधानी नवी दिल्लीला भेट देण्यासाठीही अनेक परदेशी पाहुणे येतात. दिल्लीत लाल किल्ला, इंडिया गेट, हुमायून मकबरा, कुतुबमिनार आणि राष्ट्रपती भवन अशी अनेक सुंदर ठिकाणे येथे आहेत. भारतीयांनाही दिल्ली फार आवडते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

 

WhatsApp channel